क्रिकेटटॉप बातम्या

रेकाॅर्डब्रेक..! भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, वनडेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाने मोठा पराक्रम केला आहे. टीम इंडियाने वनडे मधील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. संघाने मर्यादित 50 षटकात 435 धावा ठोकल्या आहेत. आतापर्यंतच्या भारतीय महिला संघाच्या वनडेतील सर्वात मोठी टोटल आहे. या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतके ठोकली. कर्णधार स्मृती मंधानाने (135) तर प्रतिका रावलने (154) धावांची विक्रमी खेळी खेळली. याशिवाय रिचा घोषने देखील अर्धशतकी खेळी खेळली. एकूणच भारतीय फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने इतिहास रचला आहे. 

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने अधीच 2-0 ने मालिका खिश्यात घातली आहे. पण तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया आयर्लंडला व्हाईट व्हाॅश देण्यासाठी मैदानात उतरली आहे. कर्णधार स्मृती मंधानाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जो संघाने योग्य ठरवला. पहिल्या डावात खेळताना टीम इंडीयाने इतिहास रचला आहे. आयर्लंडच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा घेत भारताने मर्यादित 50 षटकात 435 धावा ठोकल्या. जे की भारतीय संघाची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.

 

मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघाने पहिला सामना 6 विकेट्सने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात 116 धावांच्या मोठ्या फरकाने टीम इंडियाने सामना खिश्यात घातला. तर आता तिसऱ्या सामन्यात पहिल्या डावात खेळताना 435 धावांचे डोंगर उभे केले आहे. आयर्लंड संघाला क्लीन स्वीप टाळण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

हेही वाचा-

“150 किलोपेक्षा जास्त सामानाची गरज…”, भारतीय खेळाडूंवर आकाश चोप्राची बोचरी टीका
स्मृती मंधानाचं नाव इतिहासात अजरामर! भारतासाठी हा मोठा रेकॉर्ड मोडला
रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची बॅट आग ओकते, आकडेवारी पाहून व्हाल थक्कं!

Related Articles