---Advertisement---

हरमनसेनेची कमाल! एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडला 347 धावांनी चारली धूळ, दीप्ती शर्मा विजयाची नायिका

On: शनिवार, डिसेंबर 16, 2023 12:11 PM
Indian-Women-Team
---Advertisement---

Indian Women Team Won: भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील एकमेव कसोटी सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे पार पडला. हा सामना भारतीय महिला संघाने 347 धावांनी जिंकला. या विजयाची नायिका दीप्ती शर्मा ठरली. तिला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात भारतीय महिला (Indian Women Team) संघाने इंग्लंड संघाला विजयासाठी 479 धावांचे भलेमोठे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड महिला (England Women Team) संघाचा दुसरा डाव अवघ्या 131 धावांवर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. अशाप्रकारे भारतीय संघाने 347 धावांनी विजय (Indian Women Team Won) मिळवला. हा इंग्लंडविरुद्ध कसोटीतील तिसरा विजय ठरला.

https://twitter.com/BCCIWomen/status/1735911900347867577

इंग्लंडकडून कर्णधाराची 21 धावांची सर्वोच्च खेळी
या सामन्यात भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार हीदर नाईट हिने सर्वाधिक 21 धावांची खेळी केली. तिच्याव्यतिरिक्त चार्ली डीनने नाबाद 20 धावा केल्या. या दोघांशिवाय एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकली नाही. टॅमी ब्यूमोंटने 17, केट क्रॉसने 16, सोफिया डंकलेने 15, डॅनियल वाएटने 12 आणि सोफी एक्लेस्टोनने 10 धावा केल्या.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्मा (Deepti Sharma) चमकली. तिने 8 षटकात 32 धावा खर्चत सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तिच्याव्यतिरिक्त पूजा वस्त्राकरने 3, राजेश्वरी गायकवाडने 2 आणि रेणुका ठाकूरने 1 विकेट घेतली.

भारताने दिलेले 479 धावांचे आव्हान
त्यापूर्वी भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 42 षटकात 6 विकेट्स गमावत 186 धावांवर डाव घोषित केला होता. यावेळी भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सर्वाधिक नाबाद 44 धावा केल्या होत्या. तिच्याव्यतिरिक्त सलामी फलंदाज शेफाली वर्माने 33, जेमिमा रॉड्रिग्जने 27, स्मृती मंधानाने 26 आणि दीप्ती शर्माने 20 धावा केल्या होत्या. तसेच, पूजा वस्त्राकर 17 धावांवर नाबाद होती. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना चार्ली डीनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, सोफी एक्लेस्टोनने 2 विकेट नावावर केल्या.

पहिल्या डावातही इंग्लंड स्वस्तात बाद
इंग्लंड महिलांनी त्यांच्या पहिल्या डावात 35.3 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 136 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून यावेळी नॅट सायव्हर-ब्रंट हिने सर्वाधिक 59 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तिच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकली नाही. डॅनियल वाएटने 19, ऍमी जोन्सने 12, तर सोफिया डंकले आणि कर्णधार हीदरने प्रत्येकी 11 धावा केल्या. तसेच, ब्यूमोंट फक्त 10 धावाच करू शकली.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने कमाल केली. तिने फक्त 5.3 षटके गोलंदाजी करताना 7 धावा खर्चत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त स्नेह राणाने 2, तर रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारतीय महिलांचा पहिल्या डावात कहर
या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतीय महिला संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्या डावात भारतीय महिलांनी कहर फलंदाजी केली. त्यांनी 104.3 षटकात 10 विकेट्स गमावत 428 धावांचा डोंगर उभारला होता. यावेळी भारताच्या चार खेळाडूंनी अर्धशतके केली. त्यात शुभा सतीश (69), जेमिमा रॉड्रिग्ज (68), दीप्ती शर्मा (67) आणि यास्तिका भाटिया (66) यांचा समावेश होता. कर्णधार हरमनने 49 धावांचे योगदान दिले. तसेच, स्नेह राणाने 30, शेफाली वर्माने 19, स्मृती मंधानाने 17 आणि पूजा वस्त्राकरने नाबाद 10 धावा केल्या.

यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना दोघींनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यात लॉरेन बेल आणि सोफी एक्लेस्टोन यांचा समावेश होता. तसेच, केट क्रॉस, नॅट सायव्हर- ब्रंट आणि चार्ली डीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (INDWvsENGW Test indian women s team defeated england in the only test made these records)

हेही वाचा-
मुंबई-रोहित-हार्दिकच्या वादात सूर्याची उडी? ट्विटर पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष
एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! Rohit Sharmaच्या चाहत्यांनी उचललं धक्कादायक पाऊल, मुंबईचं मोठं नुकसान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---