पुणे। महाराष्ट्र क्रिडा यांच्या तर्फे आयोजित व इन्फोसिस रिक्रिएशन क्लब पुरस्कृत इन्फोसिस आंतर आयटी टी-20क्रिकेट स्पर्धेत इन्फोसीस बीयु इलेव्हन, सिमेंन्स व इन्फोसिस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
हिंजवडी फेज 2 येथील इन्फोसिस क्रिकेट मैदानावर सूरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सौरभ देवरेच्या जलद अर्धशतकी खेळाच्या जोरावर सिमेंन्स संघाने सिनेक्रॉन संघाचा 40 धावांनी पराभव केला. सौरभने केवळ 29 चेंडूत 57 धावा केल्या. सौम्य मोहंतीने केवळ 33 चेंडूत नाबाद 52 धावा करून सौरभला सुरेख साथ दिली.
दुस-या लढतीत करण पांड्याच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरवार इन्फोसीस बीयु इलेव्हन संघाने मर्क्स संघाचा 1 गडी राखून पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तर संजय पुरोहितच्या जलद 60 धावांच्या बळावर इन्फोसिस संघाने विप्रो संघाचा 54 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
मर्क्स- 20 षटकात 8 बाद 131 धावा(व्यंकटेश अय्यर 25(23), वैभव महाडीक 54 (25), साकेत वर्मा 2/17, वैभव गुप्ता 2/34, करण पांड्या 2/27) पराभूत वि इन्फोसीस बीयु इलेव्हन- 19 षटकात 9 बाद 131 धावा(स्वप्निल पवार 21 (12), आंचल ठाकूर 21 (12), करण पांड्या 38, व्यंकटेस अय्यर 3/23, प्रसाद गिरकर 2/25) सामनावीर- करण पांड्या
इन्फोसीस बीयु इलेव्हन संघाने 1 गडी राखून सामना जिंकला.
सिमेंन्स- 20 षटकात 7 बाद 217 धावा(हिमांशू अगरवाल 28 (15), अतूल पवार 49 (26), सौरभ देवरे 57 (29), सौम्य मोहंती नाबाद 52 (33), सौरभ सिंग 2/30, प्रतिक पांडा 2/42) वि.वि सिनेक्रॉन- 20 षटकात 5 बाद 177 धावा(कार्तिक हिरपारा 36 (33), मालव देसाई 63 (39), सौरभ सिंग 43 (25), दिपक कुमार 2/39, राहुल गायकवाड 2/22) सामनावीर- सौरभ देवरे
सिमेंन्स संघाने 40 धावांनी सामना जिंकला.
इन्फोसिस- 20 षटकात 7 बाद 165 धावा(गौरव बबाले 22 (16), संजय पुरोहित 60 (41), पंकज जिंता 41 (27), श्रिकर लोणकर 2/35) वि.वि विप्रो- 17.4 षटकात सर्वबाद 111 धावा(सनी भारव्दाज 64 (45), भास्कर श्रिवास्तव 3/20, रवी थापलीयाल 4/23) सामनावीर- संजय पुरोहित
इन्फोसिस संघाने 54 धावांनी सामना जिंकला.