भारतीय संघाचा माजी गोलंदाज प्रवीण कुमार आता क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसून येत नाही. परंतु त्याने गेली काही वर्षे भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या या क्रिकेटपटूने जुन्या आठवणींना उजाळा देत एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रवीण कुमारने शनिवारी (५ जून) आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक जुन्या आठवणींना उजाळा देणारा फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
या फोटोमध्ये प्रवीण कुमारसोबत रोहित शर्मा, युवराज सिंग, एमएस धोनी आणि सुरेश रैना हे दिग्गज क्रिकेटपटू दिसून येत आहेत. तसेच या फोटोवर त्याने कॅप्शन म्हणून, “मला कोणीतरी कॅप्शन सुचवा.. कोणीही?” असे लिहिले आहे. त्यानंतर चाहत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली.
एका चाहत्याने लिहिले की, “फ्रेंड्स फॉरेवर, मैत्रीच्या सुवर्ण आठवणी.” तर आणखी एका चाहत्याने लिहिले की, “वो दिन भी क्या दिन थे”
या फोटोमध्ये रोहित शर्मा असा एकमेव क्रिकेटपटू आहे, जो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. इतर खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. युवराज सिंगने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला होते. तर एमएस धोनी आणि सुरेश रैना या दोघांनी २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धोनी आणि रैना दोघेही आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतात. तर रोहित शर्मा आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
प्रवीण कुमारविषयी बोलायचे झाल्यास, त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण ६ कसोटी सामने, ६८ वनडे सामने आणि २० टी-२० सामने खेळले आहेत. प्रविनला लांबच्या शर्यतीतील घोडा असे संबोधले जात असे. परंतु काही वर्षांनी त्याला संघातून वगळण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑसी दिग्गजाने अश्विनला म्हटले सर्वश्रेष्ठ गोलंदाज, पण माजी भारतीय क्रिकेटरला नाही पचली स्तुती!
नंबर १ फॅनगर्ल! विराटसाठी ओलांडल्या होत्या सर्व सीमा; म्हणाली, ‘कृपया मला कोहली द्या’