Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतरमहाविद्यालयीन श्री शिवाजी मराठा आर्किटेक्चर क्रिकेट स्पर्धा । सिम्बायोसिस संघाचा रोमहर्षक विजय

आंतरमहाविद्यालयीन श्री शिवाजी मराठा आर्किटेक्चर क्रिकेट स्पर्धा । सिम्बायोसिस संघाचा रोमहर्षक विजय

March 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
File Photo

File Photo


पुणे : अखेरपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत विराज जुमदेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिम्बायोसिस स्कूल ऑफ प्लॅनिंग आर्किटेक्चर अँड डिझाईन संघाने आंतरमहाविद्यालयीन श्री शिवाजी मराठा आर्किटेक्चर अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर तीन धावांनी मात केली. विराजने नाबाद १५ धावा आणि तीन गडी बाद केले.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा सोमवारपासून सुरू झाली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, डॉ. नितीन पवार, विकास गोगावले, प्राचार्य चंद्रकांत कटारिया आणि पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेतील सामने महाविद्यालयाच्या अरण्येश्वर कॅम्पसमधील क्रिकेट मैदानावर होत आहेत.

सिम्बायोसिस संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ६ षटकांत ३ बाद ५५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रिनिटी संघाला ५ बाद ५२ धावाच करता आल्या.

यानंतर दुसऱ्या लढतीत विद्या प्रतिष्ठान संघाने इंदिरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर ४८ धावांनी मात केली. विद्या प्रतिष्ठान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत ५ बाद ७६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंदिरा कॉलेजला ५ बाद २८ धावाच करता आल्या. इतर लढतीत शिवाजी मराठा काॅलेज आॅफ आर्किटेक्चर संघाने पीडीईए कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर नऊ गडी राखून मात केली. पीडीईए संघाने ३ बाद ५८ धावा केल्या. शिवाजी मराठा संघाने रवी सासवदेच्या फटकेबाजीच्या जोरावर विजयी लक्ष्य ४.५ षटकांत एका गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले.

धावफलक –
१) सिम्बायोसिस –
६ षटकांत ३ बाद ५५ (विराज पाटील २०, विराज जुमदे नाबाद १५, मयूर चौधरी १-९, सार्थक तिकोने १-१६) वि. वि. त्रिनिटी – ६ षटकांत ५ बाद ५२ (कैवल्य पठाडे ३१, विराज जुमदे ३-९, दत्तराज २-१४). सामनावीर – विराज जुमदे

२) विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ५ बाद ७६ (ओंकार भोईटे ३१, प्रसाद गायकवाड १५, दुर्गेश निकम २-१३, धीरज पटेल १-१४, ऋषी गुंजाळ १-१५) वि. वि. इंदिरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ५ बाद २८ (धीरज पटेल ९, ओंकार हिंगे २-१२, प्रसाद पागळे १-४, समीर रुपनवर १-७, ऋग्वेद कुलकर्णी १-५). सामनावीर – ओंकार भोईटे

३) पीडीईए काॅलेज ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ३ बाद ५८ (युवराज मालविया नाबाद ३१, रवी कासार २-१७, सिद्धार्थ साळुंके १-१४) पराभूत वि. शिवाजी मराठा काॅलेज आॅफ आर्किटेक्चर – ४.५ षटकांत १ बाद ५९ (राज सासवदे नाबाद ३२, रवी कासार नाबाद १४). सामनावीर – राज सासवदे

४) एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत २ बाद ६४ (नवोदित साहू नाबाद ४३, प्रज्वल दिवणे नाबाद १०, ऋतुराज रिसे २-१२) वि. वि. भारतीय कला प्रसारिणी सभा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ४ बाद ६१ (राहुल पाटील २३, ऋतुराज रिसे १३, चेतन अवस्थी २-७, नवोदित साहू १-१४, यश गाढवे १-१९). सामनावीर – नवोदित साहू

५) सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ३ बाद ६५ (मयूर नाबाद ३८, रोहित १३, वेदांत गिडये १-१५, देवव्रत राजवर १-११) वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ४ बाद ५४ (आदित्य काळे १७, शरीक शेख नाबाद १५, अतुल हरिदास नाबाद १२, रवीश २-२६, केशव १-९, पुरुषोत्तम १-९). सामनावीर – मयूर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, दोन बदलांसह मैदानात उतरणार राजधानी; RCB पहिल्या विजयासाठी सज्ज
अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच, विक्रम जाणून वाढेल तुमच्याही मनातील आदर


Next Post
Rohit Sharma

रोहितने सांगितला WTC फायनल जिंकण्याचा प्लॅन! म्हणाला, "आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू..."

Virat-Kohli-Statement

सामनावीर बनताच टीकाकारांवर बरसला 'किंग' कोहली; म्हणाला, 'कुणालाही चुकीचे...'

Photo Courtesy: Twitter/BCCI

VIDEO: अहमदाबादमध्ये दिसली विराटची दिलदारी! सामन्यानंतर केलेल्या 'त्या' कृत्याची सोशल मीडियावर चर्चा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143