आंतर कार्यालय बॅडमिंटन स्पर्धा: नागेश पालकर-अभिषेक कुलकर्णी जोडीला विजेतेपद

पुणे । नागेश पालकर–अभिषेक कुलकर्णी यांच्या जोडीने सचिन मानकर–के. अनिकेत यांच्या जोडीला पराभूत करताना आंतर कार्यालय बॅडमिंटन स्पर्धेतील दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले. एकेरीच्या गटात केदार टंकसाळेने निलेश गोरेला पराभूत करताना विजेतेपद पटकावले.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉल येथे आयकर विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण आयकर अधिकारी जीवन माटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे शहर आंतर कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश विपट, सुभाष बोधे आदी मान्यवर उपस्थित होते.

वरिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत नागेश पालकर व अभिषेक कुलकर्णी यांच्या जोडीने सचिन मानकर व के. अनिकेत यांच्या जोडीला १५-१३, १५-९ असे पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये नागेश पालकर व अभिषेक कुलकर्णी यांच्या जोडीने संकेत त्रिवेदी व राहुल गुप्ता यांच्या जोडीला १५-१०, १५-६ असे पराभूत करतना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

एकेरी गटाच्या अंतिम लढतीमध्ये केदार टंकसाळे यांनी नीलेश गोरे यांना १५-१२, १५-१३ असे संघर्षपूर्ण पराभूत करतना विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य फेरीतच्या लढतीमध्ये नीलेश गोरे यांनी शशीकुमार यांना १५-८, १५-६ असे पराभूत करतना अंतिम फेरीत धडक मारली.

You might also like

Leave A Reply