इंडोनेशियाच्या मुहंमद हलिम सिदिक आणि थायलंडच्या सरुनर्क वितिडसर्न यांनी सुशांत चिपलकटट्टी कुमार गट आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मॉडर्न क्रीडा संकुलात रविवारी (4 ऑगस्ट) झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत सातव्या मानांकित मुहंम्मदने पुण्याच्या बिगरमानांकित दर्शन पुजारीचे आव्हान २१-१३, २१-१३ असे २९ मिनिटांत संपुष्टात आणले. मुलींच्या गटात नवव्या मानांकित सुरनर्क हिने तिसऱ्या मानांकित उन्नती हुडाचा चुरशीच्या लढतीत २३-२५, २१-१७, २१-१० असा पराभव केला. ही लढत तब्बल ५० मिनिटे चालली.
आजचा दिवस दर्शनचा नव्हता. एकही गेम न हरता अंतिम फेरीपर्यंत पोचलेल्या दर्शनला इंडोनेशियाच्या मुहम्मदच्या कमालीच्या आक्रमक खेळाचा सामनाच करता आला नाही. दर्शनकडून अनेक टाळता येणाऱ्या चुका झाल्या आणि त्याचा फायदा मुहम्मदने अचूक उचलला.
पहिल्या गेमला दर्शनने ३-१ अशी सुरवात केली. त्याने ५-३ पर्यंत आघाडी कायम राखली. पण, त्यानंतर मुहंम्मदने सलग पाच गुणांची कमाई करताना ३-६ अशी आघाडी घेतली आणि पुढे ६-८ अशी वाढवली. गेमच्या मध्याला मुहम्मदने ६-११ अशी आघाडी राखली होती. त्यानंतरही त्याने आघाडी कायम राखताना १७-७ अशी आघाडी वाढवून पहिली गेम सहज जिंकली. दुसऱ्या गेमला १-० अशी सुरवात केली. पण, नंतर तो १-८ असा मागे राहिला तो कायमचाच. तितक्याच सहज दुसरी गेम देखिल जिंकत मुहंम्मदने २९ मिनिटांत विजय मिळविला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरी अंतिम लढत खेळणाऱ्या सरुनर्कचे हे दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी तिने बल्गेरियात जुलै महिन्यात झालेली स्पर्धा जिंकली होती. तुर्की येथील स्पर्धेत ती उपविजेती राहिली होती. सरुनर्कच्या खेळावर मोठ्या बहिणीची छाप होती. तीन वेळा कुमार गटात जागतिक विजेती असणारी कुन्लावत वितिडसर्न ही सरुनर्क हिची मोठी बहिण.
पहिल्या गेमला २०-१७ अशी आघाडी सरुनर्क हिने घेतली होती. मात्र, उन्नतीचे जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत प्रथम बरोबरी साधली आणि नंतर २१-२०, २२-२१ अशी आघाडी घेत २३-२२ अशी पहिली गेम जिंकली. या वर्षी ओडिशा खुली स्पर्धा जिंकणाऱ्या उन्नतीने पहिली गेम जिंकताना क्रॉस कोर्टच्या सुरेख फटक्यांचा वापर केला. पण, नंतरच्या दोन गेमला सरुनर्क हिने आपला दर्जा सिद्ध करताना पूर्ण नियंत्रित खेळ केला. पहिल्या गेमला केलेल्या चुका टाळून तिने नंतर सलग दोन गेम जिंकून ५० मिनिटांत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
सरुनर्कने दोन दिवसांत दुसऱ्यांदा आपल्यापेक्षा वरच्या मानांकित खेळाडूवर विजय मिळविला. उपांत्य फेरीत तिने अव्वल मानांकित अनुपमा उपाध्यायचे आव्हान संपुष्टात आणले होते आणि अंतिम फेरीत तिने तिसऱ्या मानानंकित उन्नतीचा पराभव केला.
निकाल, सर्व अंतिम फेरी
मुली – दुहेरी
वेण्णाला कालागोटला/ श्रीयांशी वालिशेट्टी वि.वि. नरधन रविशंकर/ रिद्धी कौर तूर 21-19, 21-18
सरुनर्क विटिडसर्न (थायलंड) वि. वि. उन्नाती हुडा 23-25, 21-17, 21-10
मुले – दुहेरी
चोई जियान शेंग/ ब्रायन जेरेमी गूंटिंग (मलेशिया) वि.वि. जुआन जेरेमी झेन लियांग/ एम फाझरिक मोहम्मद रझीफ (मलेशिया) २१-१७, २१-१३
मिश्र दुहेरी
दिव्यम अरोरा / रिद्धी कौर तूर वि.वि. प्रेम कुमार प्रभू राज मोहन / कनिष्क गणेशन 21-17, 14-21, 21-15
मुले एकेरी
मुहम्मद हलीम अस सिदीक (इंडोनेशिया) वि.वि. दर्शन पुजारी 21-13, 21-13
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsPAK: मागच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या जड्डूची जागा घेण्यासाठी ‘हा’ खेळाडू सज्ज, वाचा प्लेइंग 11
‘देशी कोंबड्यांचे इजेक्शन द्या त्यांना!’ खेळाडूंच्या दुखापतींमुळे पाकिस्तानी दिग्गज संतापला
साधेभोळे राहुल द्रविड S**y शब्द उच्चारायला लाजले! पत्रकार परिषदेतील व्हिडिओ तुफान व्हायरल