भारतीय संघाने टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ४८ धावांनी पराभूत केले. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पिहले दोन सामने आफ्रिकी संघाने जिंकले होते, पण तिसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत पुनरागमने केले आहे. तिसऱ्या सामन्यातील प्रदर्शानासाठी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. त्याच्या मते आता दक्षिण आफ्रिका संघ दबावात असेल.
रिषभ पंतच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतरही तिसऱ्या टी२० साठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला नाही. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर १७९ धावा चोपल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाने १९.१ षठकात १३१ धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam-ul-Haq) याने दक्षिण आफ्रिकाच्या फलंदाजांवर दबाव बनवण्यासाठी भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले.
स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवर इंजमाम म्हणाला की, “भारतीय गोलंदाजांवर पहिल्या २ सामन्यांमध्ये त्याच्या सुमार प्रदर्शनासाठी टीका केली गेली. पण आवेश खानव्यतिरिक्त इतर सर्व गोलंदाजांनी मागच्या सामन्यात विकेट घेतल्या आणि चांगल्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी केली. भारतीय फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेलने मधल्या षठकांमध्ये मोठ्या विकेट्स घेऊन सर्वात जास्त प्रभावित केले.”
“ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, त्याचे श्रेय हर्षल पटेल आणि चहलला जाते. सामना आता रोमांचक झाला आहे. याआधी असे वाटत होते की, दक्षिण आफ्रिका संघ मालिका काबीज करेल, पण भारतीय गोलंदाजांनी असे होऊ दिले नाही. दबाव आता दक्षिण आफ्रिकेवर आहे. कारण हा भारतीय संघ मायदेशात एवढ्या सहजा सहजी पराभूत होणार नाही. संघतील युवा चेहऱ्यांचे कौतुक केले गेले पाहिजे, कारण ते निरंतर लढत आहेत. संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल नाहीयेत, पण तरीही ते चांगला विजय मिळवू शकले.” असेही इंजमाम पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघ चौथ्या टी२० सामन्यासाठी राजकोट येथे दाखल झाला आहे. यावेळी भारतीय संघाचे पारंपारिक गरबा नृत्य करत रोजकोटयेथील हॉटेलमध्ये स्वागत केले गेले. भारतीय संघ चौथ्या सामन्यांत विजय मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘कष्टाचं फळ मिळालं!’ संघात निवड झाल्यानंतर राहुल त्रिपाठीची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला
‘प्रशिक्षकांनी हार्दिकला शिकवण्याची गरज नाही’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केलेल्या विधानाने खळबळ
‘ऍटिट्यूड कमी कर!’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने कोहलीला झापले