fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतात परतलेला सुरेश रैना परत दिसणार आयपीएलमध्ये, पण…

IPL 13th Season Suresh Raina will be back with CSK Might Miss First Few Games Says Deep Das Gupta

September 6, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings


नवी दिल्ली। आयपीएलचा १३ वा हंगाम खेळण्यापूर्वीच मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने माघार घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तो वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला होता. परंतु त्याने स्वत: असे संकेत दिले आहेत की तो पुन्हा आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज संघात पुनरागमन करू शकतो. माजी भारतीय यष्टीरक्षक दीप दास गुप्तालाही विश्वास आहे की, रैना आयपीएलमध्ये पुनरागमन करू शकतो.

सीएसके संघाकडून अद्याप रैनाच्या जागी इतर खेळाडूच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. युएईला पोहोचल्यानंतर सीएसके संघाचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर रैनाने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दैनिक जागरणशी बोलताना त्याने स्वत: सांगितले होते की, तो कुटुंबाच्या सुरक्षेच्या कारणास्तव भारतात परतला आहे. त्याने हेही म्हटले की, १२ कोटी रुपये सोडण्याचा मोठा निर्णय असतो. परंतु मुलांच्या चांगल्यासाठी त्याला हा निर्णय घ्यावा लागला.

दीप दास गुप्ताने एका मुलाखतीत रैनाच्या पुनरागमनाबद्दल चर्चा करताना म्हटले, “मला असे वाटते की रैना पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. कदाचित सुरुवातीच्या सामन्यात तो खेळणार नाही. कारण त्याला नियमांनुसार क्वारंटाईन केले जाईल. परंतु माझा असा विश्वास आहे की रैना पुनरागमन करेल.”

रैनानेही आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते. त्याने एका इंग्रजी क्रिकेट वेबसाईटशी बोलताना म्हटले होते, “मी क्वारंटाईनमध्येही इथे सराव करत आहे. तुम्ही मला पुन्हा शिबिरात पाहू शकता.”

विशेष म्हणजे सीएसकेचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगनेही वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याने ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती. त्याने लिहिले होते की, “कुटुंबासोबत अशा कठीण काळात राहणे गरजेचे आहे.” सोबतच त्याच्या या निर्णयाचा सन्मान करण्यासाठी संघ व्यवस्थापनाला त्याने धन्यवादही दिला होता.

Dear Friends
I will not be playing IPL this year due to personal reasons.These are difficult times and I would expect some privacy as I spend time with my family. @ChennaiIPL CSK management has been extremely supportive and I wish them a great IPL
Stay safe and Jai Hind

— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 4, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात होत आहे, तर आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी नाकी नऊ आणण्यासाठी केकेआरच्या गोलंदाजाचा मास्टर प्लॅन तयार

-इंग्लंड विरुद्ध खराब गोलंदाजी केली ॲडम झाम्पाने; पण ट्रोल झाला आरसीबी संघ

-डेव्हिड वॉर्नरने या विक्रमाच्या यादीत मिळवले तिसरे स्थान; आता केवळ रोहित, विराट आहेत पुढे

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स

-वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा प्रज्ञान ओझा

-आयपीएलचे सितारे : धोनीचा आदर्श घेतलेला झारखंडचा २२ वर्षीय विराट सिंग


Previous Post

आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी नाकी नऊ आणण्यासाठी केकेआरच्या गोलंदाजाचा मास्टर प्लॅन तयार

Next Post

एका पराभवाने व्यथित झालेल्या देशाला धोनी हवा आहे फिनीशर म्हणून संघात

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

एका पराभवाने व्यथित झालेल्या देशाला धोनी हवा आहे फिनीशर म्हणून संघात

Photo Courtesy: Twitter/ ICC

ठरलं तर! बहुचर्चित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या निवडीची वेळ ठरली

Photo Courtesy: Twitter/ Delhicapitals

गेले एक वर्ष देशात सर्वाधिक चर्चेत राहिलेला गोलंदाज यावेळी दिल्लीच्या ताफ्यात

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.