fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केवळ चार आयपीएल सामन्यातच झाले ३ मोठे खेळाडू जखमी

ipl 2020 3 big players who injured

September 23, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


आयपीएल २०२० ची सुरुवात झाली असून आतापर्यंतचे सर्व ४ सामने हे रोमांचक सामने झाले आहेत. यातील एक सामना अगदी सुपर ओव्हरपर्यंत गेला. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघानी प्रत्येकी एकेएक आयपीएल सामला जिंकला आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेले सामने सर्व एकतर्फी झाले नाहीत. यात अखेरच्या षटकात सामन्याचा निकाल समोर आला. एकंदरीत आयपीएलची सुरुवात चांगली झाली आहे. परंतु या सर्वांच्या दरम्यान एक गोष्ट सर्व संघांसाठी भीती निर्माण करत आहे. ती म्हणजे खेळाडूंना होणारी दुखापत. आत्तापर्यंत ३ मोठ्या खेळाडूंना दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. परंतु, या अनुभवी खेळाडूंपैकी अद्याप एक खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. या लेखामध्ये आयपीएल २०२०मध्ये आतापर्यंत जखमी झालेल्या ३ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

आयपीएलच्या हंगामात आतापर्यंत ३ खेळाडू जखमी

१. आर अश्विन

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटलचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन जखमी झाला. जेव्हा तो गोलंदाजीसाठी आला तेव्हा पहिल्याच षटकात दोन बळी घेत त्यानं किंग्ज इलेव्हन पंजाबला मोठा धक्का दिला होता. त्याने प्रथम करुण नायरला बाद केले आणि त्यानंतर निकोलस पुराणला बाद केले. पण षटकातील शेवटच्या चेंडूवर डाईव्ह करून चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याच्या खांद्याला दुखापत झाली.

पण नंतर त्याने ट्विट करुन ही दुखापत जास्त गंभीर नसल्याचे सांगितले. त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्सकडून उर्वरित सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

२. मिशेल मार्श

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुबईमध्ये शानदार सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स संघाला १० धावांनी पराभव पत्करावा लागला आणि तसेच त्यांना अनुभवी अष्टपैलू मिशेल मार्शही जखमी झाला. मिशेल मार्श गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता आणि त्याला तातडीने मैदानातून बाहेर पडावे लागले होते. परंतु, लक्ष्याचा पाठलाग करताना जेव्हा सनरायझर्सने ८ गडी गमावले तेव्हा दुखापतीनंतरही तो फलंदाजीसाठी आला. परंतु तो एकही धाव करू शकला नाही. मिशेल मार्शची दुखापत गंभीर दिसत आहे, कारण त्याला सामना सुरु असताना चालतानाही त्रास होत होता. त्यामुळे कदाचित तो उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर पडू शकतो.

३. राशिद खान

आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान मिशेल मार्श नंतर राशिद खान देखील जखमी झाला होता. वास्तविक, राशिद खान आणि अभिषेक शर्मा फलंदाजी दरम्यान दोन धावा घेण्याचा प्रयत्न करीत होते आणि यावेळी दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले.

ही टक्कर इतकी वेगात होती की राशिद जमिनीवर पडला आणि तो काही काळ झोपूनच राहिला. मात्र, फिजिओ उपचारानंतर त्याने पुन्हा फलंदाजी केली. आता पुढच्या सामन्यात तो खेळतो की नाही हे पाहणे बाकी आहे.


Previous Post

वाढदिवस विशेष- माहित नसलेला अंबाती रायडू

Next Post

तू वरच्या क्रमांकावर फलंदाजीला का येत नाही? धोनीने दिले ‘हे’ उत्तर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

तू वरच्या क्रमांकावर फलंदाजीला का येत नाही? धोनीने दिले 'हे' उत्तर

Photo Courtesy: Twitter/IPL

पुन्हा एकदा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने घातला पंचाशी वाद, 'हे' आहे कारण

दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.