fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताच्या १९ वर्षांखालील संघातील हे ३ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज, अंतिम अकरामध्ये स्थान निश्चित

ipl 2020 3 under 19 players who are guaranteed a place in the playing eleven

September 10, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएल स्पर्धा येत्या १९ सप्टेंबरला यूएईमध्ये सुरु होईल. ही स्पर्धा सुरु होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेत काही युवा खेळाडू खेळताना दिसतील. २०२० मधील १९ वर्षाखालील विश्वचषकामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना आयपीएलच्या संघांनी विकत घेतले आहे. या लेखात त्या ३ युवा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांना आयपीएलचे संघ त्यांच्या पहिल्याच सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान देऊ शकतात.

भारताच्या १९ वर्षांखालील संघातील ३ खेळाडू, ज्यांचे अंतिम अकरामध्ये स्थान निश्चित

यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal)

यशस्वी जयस्वालला राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२० च्या लिलावासाठी २.४० कोटी किंमतीला विकत घेतले. राजस्थान संघ आता या युवा खेळाडूला पहिल्या सामन्यातच संधी देऊ शकतो आणि असे झाल्यास सलामीला फलंदाजी करताना दिसेल.

१९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत यशस्वी जयस्वालने ६ सामन्यात १३३.३ च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण ४०० धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ८२.४७ होता. त्याने या स्पर्धेत एकूण ४ अर्धशतके आणि १ शतक झळकावले होते.

तसेच विजय हजारे वनडे स्पर्धेत त्याने दुहेरी शतकही केले आहे. आयपीएल २०२० मधील राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल जोस बटलरबरोबर सलामीला खेळताना दिसू शकतो.

रवी बिश्नोई (Ravi Bishnoi)

रवी बिश्नोईला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आयपीएल २०२० च्या लिलावात २ कोटींच्या मोठ्या रकमेवर खरेदी केले आहे. पहिल्याच सामन्यात अंतिम अकरामध्ये या युवा खेळाडूचे स्थान निश्चित असल्यातच जमा आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात रवी बिश्नोईने शानदार गोलंदाजी केली आणि सर्वांना आकर्षिक केले.

१९ वर्षांखालील विश्वचषकात रवी बिश्नोईने ६ सामन्यात १०.६४ च्या प्रभावी सरासरीने एकूण १७ बळी घेतले. त्याने या स्पर्धेत ३ वेळा ४ बळी घेण्याचा पराक्रमही केला.

१९ वर्षांखालील विश्वचषकातील ही उत्कृष्ठ आकडेवारी पाहता किंग्ज इलेव्हन पंजाब संघ त्याला बाहेर बसवेल असे वाटत नाही.
गोलंदाजीत तो महत्वाचे योगदान देईलच परंतु फलंदाजीतही योगदान देण्याची क्षमता या फिरकीपटूकडे आहे.

कार्तिक त्यागी (Karthik Tyagi)

१९ वर्षांखालील विश्वचषकात कार्तिक त्यागीची वेगवान गोलंदाजी आणि स्विंग होणारा चेंडू खेळणे फलंदाजांना कठीण जात होते. या स्पर्धेचे मोठे फलंदाज त्यांच्यासमोर अपयशी ठरले. त्याने ६ सामन्यात १३.९० च्या सरासरीने आणि ३.४५ च्या इकॉनॉमी रेटने ११ बळी घेतले.

आयपीएल २०२० च्या लिलावात कार्तिक त्यागीला राजस्थान रॉयल्स संघाने १.३० कोटी किंमतीला विकत घेतले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघानेही या वेगवान गोलंदाजाला विकत घेण्यात रस दाखविला होता, पण या लिलावात शेवटी राजस्थान रॉयल्स संघाने बाजी मारली आणि त्याला आपल्या संघात घेतले.

राजस्थान रॉयल्स संघात तितका चांगला भारतीय वेगवान गोलंदाज नाही, त्यामुळे त्याला पहिल्याच सामन्यात संधी द्यायला संघाला नक्की आवडेल.

ट्रेंडिंग लेख –

असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट

या माजी कर्णधाराला ‘तो’ सामना खेळण्यात वाटत होती भीती; प्रशिक्षकाचा खुलासा

…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला

महत्त्वाच्या बातम्या – 

वेगवान धावा करत नाही म्हणून संघातून वगळले; याचा राग त्याने काढला अभ्यासावर

मालिकेत सर्वाधिक धावा करूनही ‘त्याला’ ठेवले राखीव खेळाडूंच्या यादीत

अमेरिकन ओपनमध्ये सुपर मॉमचे वर्चस्व; सेरेना-आझारेंका येणार सेमीफायनलमध्ये आमने-सामने


Previous Post

चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या युवा खेळाडूला रोहित शर्माने दिल्या टिप्स; पहा व्हिडिओ

Next Post

लीग भारतीय आहे पण मग भारतीय मुख्य प्रशिक्षक किती? या दिग्गज खेळाडूने विचारला प्रश्न

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Next Post

लीग भारतीय आहे पण मग भारतीय मुख्य प्रशिक्षक किती? या दिग्गज खेळाडूने विचारला प्रश्न

आयपीएल इतिहासातील पहिल्याच सामन्यात वादळी खेळी करणाऱ्या ब्रँडन मॅक्युलमला गांगुली म्हणाला होता, तूझे आयुष्य...

आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकणार नाही मुंबई इंडियन्सचा हा फलंदाज; या दिग्गजांनी केलाय दावा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.