fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये झळकावणार शतक, पहा कोण आहेत ते ३ युवा भारतीय फलंदाज

ipl 2020 3 young indian batsman who could score century this season

September 9, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएलच्या १३ व्या रणसंग्रामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. त्यामुळे सर्व संघ आता तयारीत व्यस्त आहेत. या स्पर्धेत दरवर्षी अनेक युवा खेळाडूंना संधी मिळते. हे युवा खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवतात आणि आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवतात.

आयपीएलच्या या हंगामात बरेच सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडू खेळताना दिसणार आहेत. आयपीएलमध्ये युवा खेळाडू खूप यशस्वी होतात. आयपीएलमध्ये असे अनेक फलंदाज आहेत ज्यांनी उत्तम कामगिरी केली आणि शतकही ठोकले. या लेखामध्ये अशा ३ भारतीय युवा फलंदाजांबद्दल जाणून घेऊया जे आयपीएलच्या या हंगामात शतक ठोकू शकतील. हे खेळाडू चांगली फलंदाजी करतात आणि यातील एक खेळाडू भारतीय संघाकडूनही खेळला आहे.

या आयपीएल हंगामात शतक ठोकू शकणारे ३ युवा भारतीय फलंदाज

३. रायन पराग- राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स संघाचा युवा फलंदाज रायन पराग देखील या मोसमात शतक ठोकू शकतो. तो एक उत्तम फलंदाज आहे. गेल्या हंगामातच त्याने एक विक्रम केला आहे.

त्याने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करत अर्धशतक झळकावले होते. त्याने अर्धशतकी खेळी साकारत आयपीएलमधील सर्वात युवा अर्धशतक करणारा खेळाडू ठरला. रायन परागने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले आणि या मोसमात तो अशाच प्रकारे फलंदाजी करू शकतो. परंतु, त्यासाठी त्याला सतत संधी मिळणे आवश्यक आहे.
आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण संधी मिळाल्यास आणि फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळाल्यास रायन पराग नक्कीच शतक ठोकू शकतो.

२. शुबमन गिल- कोलकाता नाईट रायडर्स

शुबमन गिल केकेआरचा सर्वोत्तम युवा फलंदाज आहे. २०१८ च्या १९ वर्षाखालील विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर केकेआरने त्याला आपल्या संघात सामील केले. मागील आयपीएल हंगाम शुबमन गिलसाठी उत्कृष्ट होता.

आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत २७ सामन्यांत ४९९ धावा केल्या आहेत. मागील हंगामात त्याने ४५ चेंडूत ७६ धावांची जबरदस्त खेळी खेळली होती. जर त्याला सलामीची संधी मिळाली तर तो या मोसमात आयपीएलमध्ये शतक ठोकू शकतो.

१. पृथ्वी शॉ- दिल्ली कॅपिटल्स

पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. गेल्या हंगामात तो आयपीएलमध्ये शतक ठोकण्याच्या अगदी जवळ आला होता. पृथ्वी शॉ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ९९ धावांवर बाद झाला आणि केवळ १ धावेने शतकी खेळी गमावली. त्याने ५५ चेंडूत ९९ धावा केल्या होत्या. परंतु, या मोसमात तो आयपीएलमधील आपले पहिले शतक ठोकू शकतो. पृथ्वी शॉने आतापर्यंत २५ सामन्यांत आयपीएलमध्ये ५९८ धावा केल्या आहेत आणि ४ वेळा अर्धशतक ठोकले आहे.

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?

-३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध

-आयपीएल संघांची चिंता वाढली; टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे हे ५ खेळाडू झाले फ्लॉप

महत्त्वाच्या बातम्या-

-युजवेंद्र चहलने केले ‘युनिवर्सल बॉल’ ख्रिस गेलला ट्रोल म्हणाला, अंकल काय….

-पदार्पणाच्या वर्षातच संघाला एक नव्हे तर दोन ट्रॉफी दिल्या जिंकून, आता तोच खेळाडू बनवेल विराटच्या आरसीबीला विजेता

-शाहरूख खानच्या नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी, तर… 


Previous Post

युजवेंद्र चहलने केले ‘युनिवर्सल बॉल’ ख्रिस गेलला ट्रोल म्हणाला, अंकल काय….

Next Post

आयपीएलमध्ये २ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळालेला ‘हा’ खेळाडू विकायचा पाणीपुरी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
Next Post

आयपीएलमध्ये २ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळालेला 'हा' खेळाडू विकायचा पाणीपुरी

मुंबईचा पोरगा घाबरतोय वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला, म्हणतोय त्याच्याविरुद्ध मला नाही करायची गोलंदाजी

आयपीएलमध्ये विराट-धोनीसारख्या भारतीय दिग्गजांनाच करावा लागणार अडचणींचा सामना; जाणून घ्या कारण

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.