मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कृणाल पांड्या याला मुंबई विमानतळावर डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यूएईमधून आयपीएल २०२० चा हंगाम खेळून मायदेशी परतल्यावर कृणाल पांड्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
प्राप्त माहितीनुसार कृणाल पांड्याकडे सोन्याची दागिने, बांगड्या आणि इतर मौल्यवान वस्तू आढळून आले आहे. प्रवासाच्या नियमानुसार त्याने अधिक सोनं बाळगल्याने त्याची मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्सने पराभूत करत विजय मिळवला. यासोबतच आयपीएलचे ५वे विजेतेपदही पटकावले. यानंतर खेळाडू आपापल्या मायदेशात परतले. परंतु युएईमधून भारतात परतलेला मुंबई इंडियन्सचा खेळाडू कृणाल पंड्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतल्याचे वृत्त समाज माध्यमात पसरल्याने चाहते चिंतेत आहेत.
कृणालने या हंगामात १६ सामने खेळले. हे सामने खेळताना त्याने केवळ ६ विकेट्स घेतले. याव्यतिरिक्त त्याने फलंदाजी करताना १०९ धावाही केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलियाला सापडला नवा पॉटींग, भारताविरुद्ध कसोटी मालिकेत करणार पदार्पण
-भारीच ना! आयपीएल २०२१मध्ये असणार ‘इतके’ संघ, तब्बल ७६ सामन्यांची प्रेक्षकांना मेजवानी?
-विरेंद्र सेहवागने तयार केला सर्वोत्तम आयपीएल संघ, विराट कोहली कर्णधार तर रोहित शर्मा…
ट्रेंडिंग लेख-
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
-आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
-रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर