मुंबई । इंडियन प्रीमियर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अडचणीत सापडला. प्रथम संघातील सदस्यांना कोरोना संक्रमण झाल्याचे आढळले आणि त्यानंतर सुरेश रैना आणि हरभजन सिंगसारख्या दिग्गजांनी स्पर्धेतून माघार घेतली. सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर कर्णधार एमएस धोनीने सर्वकाही सांभाळण्याचे आश्वासन दिले आहे, असे संघाचे मालक एन श्रीनिवासन म्हणाले होते.
संघाचे कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथ यांनी टीमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितले की, “सुरेश रैना आणि हरभजन सिंग स्पर्धेतून माघार घेतल्यानंतरही त्यांचा संघ संतुलित आहे. दोन्ही दिग्गजांनी माघार घेतल्यामुळे चेन्नई संघाला नक्कीच धक्का बसला आहे. परंतु तरीही सर्व काही नियंत्रणात आहे. कारण धोनीची उपस्थिती प्रत्येक अडचण सुकर करते.”
“मी तुम्हाला सांगतो की, संघ सध्या योग्य आहे, आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आमच्याकडे एक कर्णधार आहे ज्याने आम्हाला वाईट काळातून बाहेर काढले. थाला नक्कीच संघाची काळजी घेईल आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. आम्ही एक दिवस अगोदर सराव सुरू केला,” असेही के एस विश्वनाथ यांनी सांगितले.
"Thalaivan will definitely take care…" Our Super Boss addresses the Super Fans. ???????? #StartTheWhistles #Yellove #WhistlePodu pic.twitter.com/jMZLOyl5yG
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 6, 2020
काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका चाहत्याने रैना तिथे नसल्यानंतर सीएसकेचा उप-कर्णधार कोण असेल असा प्रश्न विचारला होता. यावर ते म्हणाले, “जेव्हा आमच्याकडे चतुर कर्णधार असेल तेव्हा काळजी करण्याची काय गरज आहे.”
रविवारी 6 सप्टेंबर रोजी बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-कसोटीत त्रिशतक ठोकलेला खेळाडू म्हणतो, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरच मला…
-आयपीएल २०२० बाबत विराट कोहली म्हणतो, मला २०१६ सारखं…
-त्याला फटकेबाजी करताना रोखणे केवळ अशक्य, आम्हाला प्लॅनच बदलावा लागणार
ट्रेंडिंग लेख-
-जर तेव्हा टी-२० क्रिकेट असते तर, हे ५ दिग्गज खेळाडू ठरले असते हिरो
-आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य
-एकहाती सामना बदलायची ताकद ठेवणारा प्रत्येक संघाचा दमदार परदेशी खेळाडू