fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर चाहत्यांना झाले धोनीचे दर्शन; सीएसकेची सरावाला सुरुवात

IPL 2020 CSK Started It's Training In UAE As MS Dhoni Faced Ravindra Jadeja And Piyush Chawla

September 5, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Screengrab: Instagram/Chennaiipl

Screengrab: Instagram/Chennaiipl


नवी दिल्ली। चेन्नई सुपर किंग्जने अखेर या हंगामात प्रशिक्षण सत्र युएईमध्ये सुरू केले. परंतु त्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन खेळाडूंचा समावेश नाही. कारण त्यांना 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी व त्यानंतर दोन निगेटिव्ह चाचण्या पूर्ण करणे बाकी आहे. सुरुवातीलाच 13 सदस्यांची (दोन खेळाडूंसह) कोव्हिड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता ही चेन्नईसाठी चांगली बातमी आहे.

चेन्नई सुपर किंग्जला अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने वैयक्तिक कारणे सांगून आयपीएल मध्ये खेळण्यास नकार दिल्याने शुक्रवारी आणखी मोठा धक्का बसला. सुरेश रैनानंतर हरभजन स्पर्धेतून माघार घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

दुबईतील आयसीसी अ‍कादमीमध्ये हा सराव होता. यादरम्यान रवींद्र जडेजा आणि पीयुष चावला यांचा सामना करत धोनी नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. युएईमध्ये जाण्यापूर्वी 5 दिवसांच्या शिबिरावेळी संघाने चेन्नई येथे प्रशिक्षण घेतले होते. 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी जडेजा आणि चावलाच्या गोलंदाजीवर सहजपणे खेळत होता.

सोशल मीडियावर सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये शेन वॉटसन देखील फिरकीपटू कर्ण शर्माविरूद्ध सराव करताना दिसत होता. जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरही नेटमध्ये सराव करत होता.

कोव्हिड-19 प्रकरणांमुळे त्यांना क्वारंटाईन ठेवण्याच्या कालावधीत जास्त वेळ घालवावा लागला म्हणून युएईमध्ये आल्यानंतर प्रशिक्षण सुरू करणारी सीएसके ही शेवटची टीम होती.

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन म्हणाले की, “जर आवश्यक असेल तर फ्रँचायझी सलामी सामना खेळण्यास सज्ज होईल.”

View this post on Instagram

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on Sep 4, 2020 at 8:24am PDT

बीसीसीआयच्या सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले आहे की, चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळेल.

आयपीएल 2020 चे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार असून या स्पर्धेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-६ षटकार ठोकत सिमन्सने केल्या ९६ धावा, नाईट रायडर्सने मिळविला सलग ८ वा विजय

-धोनीला क्रिकेटचे धडे देणाऱ्या या मार्गदर्शकाच्या स्थितीत सुधारणा, ५ दिवसांपासून होते व्हेंटिलेटरवर

-आयपीएलमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी जॉन्टी र्‍होड्सने केली ‘ही’ विशेष मागणी

ट्रेंडिंग लेख-

-…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली

-बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या

-आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत


Previous Post

आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स

Next Post

इंग्लंड विरुद्ध खराब गोलंदाजी केली ॲडम झाम्पाने; पण ट्रोल झाला आरसीबी संघ

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/BBL
क्रिकेट

व्हिडिओ: धाव घेताना फलंदाजाची गोलंदाजांशी घातक टक्कर, त्यानंतर घडलं असं काही की तुम्ही कराल कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/ virendersehwag
क्रिकेट

स्वागत नहीं करोगे? आपल्या गावात परतल्यानंतर टी नटराजनचे मिरवणूक काढून जंगी स्वागत

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/mipaltan
क्रिकेट

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ

January 21, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/RCBTweets

इंग्लंड विरुद्ध खराब गोलंदाजी केली ॲडम झाम्पाने; पण ट्रोल झाला आरसीबी संघ

Photo Courtesy: Twitter/ ICC

डेव्हिड वॉर्नरने या विक्रमाच्या यादीत मिळवले तिसरे स्थान; आता केवळ रोहित, विराट आहेत पुढे

Photo Courtesy: Twitter/ KKRiders

आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी नाकी नऊ आणण्यासाठी केकेआरच्या गोलंदाजाचा मास्टर प्लॅन तयार

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.