जगभरातील क्रिकेटप्रेमींची सर्वात आवडती टी२० लीग आयपीएलने १३ व्या हंगामातील आपला अर्ध्यापेक्षा अधिक प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंत काही खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. परंतु काही खेळाडू असेही आहेत, ज्यांच्यावर फ्रँचायझी संघांनी करोडो रुपये खर्च करूनही त्यांनी अपेक्षित कामगिरी केली नाही.
अशाच ३ खेळाडूंबद्दल या लेखात जाणून घेऊया, ज्यांना आयीएलच्या १३ व्या हंगामात सर्वाधिक रुपये मिळूनही खास प्रदर्शन करता आले नाही.
आयपीएल २०२०मध्ये फ्लॉप ठरलेले ३ खेळाडू
१. पॅट कमिन्स
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला दोन वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघाने तब्बल १५.५ कोटी रुपयांना संघात सामील केले होते. यापूर्वीही तो २०१४ च्या आयपीएल हंगामात कोलकाताकडून खेळला आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात कमिन्सला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने आतापर्यंत ९ सामने खेळताना केवळ ३ विकेट्स घेत १२६ धावा केल्या आहेत. कोलकाता संघाला त्याच्याकडून पुढील सामन्यांमध्ये चांगली कामगिरीची अपेक्षा असेल.
२. ग्लेन मॅक्सवेल
आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत झालेल्या फ्लॉप खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका खेळाडूचा समावेश आहे. तो खेळाडू म्हणजेच अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल होय. मॅक्सवेलला किंग्स इलेव्हन पंजाब संघाने १०.७५ कोटी रुपयांना संघात सामील केले होते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांमध्ये एकही षटकार ठोकलेला नाही. त्याला केवळ ५८ धावांवरच समाधान मानावे लागले आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजीमध्ये त्याने केवळ २ विकेट्स मिळवले आहेत. त्याच्या पंजाब संघाला या हंगामात संघर्ष करावा लागत आहे.
३. शेल्डन कॉट्रेल
यानंतर फ्लॉप खेळाडूंमध्ये तिसरे नाव आहे वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल. तो आपल्या विकेट सेलिब्रेशनसाठी चांगला प्रसिद्ध आहे. पंजाब संघाने त्याला आयपीएल २०२०मध्ये ८.५ कोटी रुपयांना संघात घेतले होते. त्याने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यात केवळ ६ विकेट्स घेतल्या आहेत. सोबतच ८.८ च्या सरासरीने त्याने धावा दिल्या आहेत. या हंगामात त्याने सर्वात महागडे षटकही टाकले आहे. सध्या पंजाब संघाने त्याला वगळले आहे.
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
-सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…
महत्त्वाच्या बातम्या-
-‘युवांमध्ये नाही तर चावला-जाधवसारख्या वयस्करांमध्ये कसली प्रतिभा,’ माजी क्रिकेटरची धोनीवर टीका
-‘अजूनही सीएसकेसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडे,’ माजी क्रिकेटरचे मोठे भाष्य