आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत ३९ सामने खेळले आहेत. फ्रँचायझी संघांमध्ये अंतिम ४मध्ये पोहोचण्यासाठी कसून स्पर्धा सुरू आहे. बुधवारी (२१ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे तीन वेळचा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीसाठी प्लेऑफसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत.
याव्यतिरिक्त विराट कोहलीचा संघ बेंगलोरने मिळवलेल्या विजयानंतर किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारही खुश दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या प्लेऑफच्या शर्यतीबद्दल…
या ३ संघांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित
आयपीएल २०२० मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित आहे. दिल्ली आणि बेंगलोर संघांकडे प्रत्येकी १४ गुण आहेत, तर मुंबईकडे १२ गुण आहेत. मुंबईने आतापर्यंत केवळ ९ सामने खेळले आहेत. मुंबईला आणखी ५ सामने खेळायचे आहेत. अशामध्ये हे तीनही संघ कमीत कमी दोन किंवा तीन सामने जिंकत प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करू शकतात.
कोलकाता नाईट रायडर्सला उर्वरित सामन्यात मिळवावा लागेल विजय
कोलकाता नाईट रायडर्स संघाला आणखी ४ सामने खेळायचे आहेत. सध्या कोलकाताकडे १० गुण आहेत. परंतु बेंगलोरविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर त्यांच्या रनरेटमध्ये घट झाली आहे. अशामध्ये कोलकाता संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.
किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या आशा कायम
सलग ५ सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाब संघाने स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील पंजाब संघाने मागील ३ सामन्यात सलग विजय मिळवला आहे. अशामध्ये उर्वरित ४ सामन्यांमध्ये विजय मिळवत पंजाब संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो.
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद
राजस्थान संघ १० सामन्यांनंतर ८ गुण मिळवत गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे, तर ९ सामन्यांमध्ये ६ सामने पराभूत होत हैदराबाद संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद संघाकडे ६ गुण आहेत. या दोन्ही संघांना आयपीएल २०२० स्पर्धेतील उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत.
चेन्नई सुपर किंग्स संघही पोहोचू शकतो प्लेऑफमध्ये
आयपीएल २०२० च्या हंगामात एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे. चेन्नईकडे सध्या ६ गुण आहेत. जर चेन्नई संघाने उर्वरित चारही सामने जिंकले आणि इतर संघ सलग सामना पराभूत झाले, तर चेन्नईसाठी संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video : आयपीएलमधून बाहेर पडलेल्या ड्वेन ब्राव्होचा चेन्नईच्या चाहत्यांसाठी भावूक संदेश, म्हणाला…
-‘एक तर तुम्ही जिंकता किंवा काहीतरी शिकता,’ दिग्गजाने केली धोनीची प्रशंसा
-सीएसकेला दूसऱ्या ड्वेन ब्रावोचा शोध, ‘ही’ ३ नावं आहेत चर्चेत
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज