fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिस्टर आयपीएल रैनाच्या जागी हे ४ खेळाडू बनतील चेन्नई संघाचे उपकर्णधार

September 8, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये सुरू होणार आहे.  पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गेल्या वर्षीचा उपविजेता फ्रँचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी सीएसकेच्या दोन मोठ्या खेळाडूंंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यातील एक संघाचा उपकर्णधार सुरेश रैना, तर दुसरा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग आहे.

रैना आयपीएलचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. तो बर्‍याच वर्षापासून सीएसकेकडून खेळत आहे. रैना दुबईमध्ये या स्पर्धेसाठी दाखल झाला होता. परंतु संघातील दोन खेळाडू आणि कर्मचारी वर्ग कोव्हिड- 19 पॉझिटिव्ह झाल्यानंतर रैनाने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी रैना भारतात प्रशिक्षण घेत आहे. परिस्थिती सुधारल्यास युएईमध्ये परत येऊ शकेल, असेही त्याने म्हटले आहे.  त्याच्या परतीचा निर्णय कर्णधार एमएस धोनी आणि संघ व्यवस्थापन घेतील. संघात अशी चार नावे आहेत, ज्यांना उप-कर्णधारपद देता येईल.

सीएसकेने अद्याप या दोन खेळाडूंच्या जागी कोणत्याही इतर खेळाडूंची निवड केली नाही. विशेष म्हणजे रैनाच्या जागी संघाचा उपकर्णधार कोण आहे ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चला तर मग सीएसकेचा उप-कर्णधार बनू शकणाऱ्या खेळाडूंवर नजर टाकूया.

1. रवींद्र जडेजा

अष्टपैलू रवींद्र जडेजाने कधीही संघाचे नेतृत्व केले नसले तरी त्याचा अनुभव त्याला उपकर्णधारपदासाठी सर्वात मोठा दावेदार करु शकतो. जडेजाला संघाचा भावी कर्णधार म्हणूनही पाहिले जाऊ शकते. जडेजाला सीएसकेने 2012 मध्ये आपल्या संघात घेतले होते. त्याने सीएसकेसाठी 102 सामन्यांत 865 धावा केल्या असून त्याने 81 बळी घेतले आहेत.

2. केदार जाधव

संघातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटूंपैकी जाधव यालाही सीएसकेचा नवा उप-कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.  35 वर्षीय जाधवला राज्य संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. जाधवने भारतीय संघाकडून 73 वनडे सामने आणि 130 टी20 सामने खेळले आहेत. सीएसकेने जाधवला सीएसएल 2018 मध्ये संघात समाविष्ट केले होते.

3. फाफ डू प्लेसिस

दक्षिण आफ्रिका संघाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर फाफ डू प्लेसिसने नेतृत्व केले आहे. त्याने 36 कसोटी, 39 वनडे आणि 37 टी20 आंतरराष्ट्रीय सामने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. फाफ हा एक जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याने सीएसकेसाठी 63 सामन्यांत 1639 धावा केल्या आहेत. त्याला उपकर्णधारही बनता येईल.

4. शेन वॉटसन

शेन वॉटसनने 2019च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीसह खेळत 59 चेंडूत 80 धावा केल्या आणि संघाला विजयाच्या जवळ आणले. वॉटसनच्या गुडघ्यात रक्तस्त्राव होत होता. तरीही तो संघासाठी जोखीम घेत शॉट्स खेळत होता. सीएसकेबद्दलची त्यांची निष्ठा यातून दिसून येते. याशिवाय वॉटसन हा एक अनुभवी क्रिकेटपटू आहे, त्यामुळे त्याला संघाचा उप-कर्णधार बनता येईल.

ट्रेंडिंग लेख-

-रोहित-धोनी नव्हे तर ‘हे’ ३ क्रिकेटर्स आयपीएल २०२०मध्ये पटकावतील सर्वाधिक षटकार मारण्याचा अवॉर्ड

-विराटच्या आरसीबीला पराभवाची धूळ चारण्यासाठी हैद्राबादचा वॉर्नर उतरेल ‘या’ ११ शिलेदारांसह

-लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!

महत्त्वाच्या बातम्या-

-पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांवर येऊ शकते बंदी; पहा काय आहे कारण

-“डीआरएस घेणार नाही, काळजी करू नको,” धोनीचा मजेदार व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

-गब्बर म्हणतो, आता केवळ ज्युनिअरचं नव्हे तर सिनियर खेळाडूही घेणार ‘या’ खेळाडूकडून धडे


Previous Post

पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांवर येऊ शकते बंदी; पहा काय आहे कारण

Next Post

आयपीएल संघांची वाढली डोकेदुखी, ‘या’ २ संघातील खेळाडू खेळणार नाहीत आयपीएलचे सुरुवातीचे सामने

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी

April 11, 2021
Next Post

आयपीएल संघांची वाढली डोकेदुखी, 'या' २ संघातील खेळाडू खेळणार नाहीत आयपीएलचे सुरुवातीचे सामने

केकेआरचा 'तो' नवा खेळाडू आहे केविन पीटरसनपेक्षाही खतरनाक, यावेळी करणार...

सतत पराभव पाहणाऱ्या आरसीबीच्या कर्णधार कोहलीने केले मोठे वक्तव्य

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.