आयपीएल २०२० चा ३१ वा सामना गुरुवारी (१५ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना पंजाब संघाने ८ विकेट्सने जिंकला. या हंगामातील हा पंजाबचा दुसराच विजय होता. पंजाबच्या या विजयाचा हीरो कर्णधार केएल राहुल ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाणेफेक जिंकत बेंगलोरने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७१ धावा केल्या होत्या. या धावांचे आव्हान पंजाब संघाने केवळ २ विकेट्स गमावत आणि १७७ धावा करत पूर्ण केले.
पंजाबकडून फलंदाजी करताना कर्णधार राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४९ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची तडाखेबंद खेळी केली. यामध्ये १ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. यासोबतच युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल (५३) आणि मयंक अगरवालने (४५) धावांचे योगदान दिले, तर शेवटच्या चेंडूवर १ धाव हवी असताना फलंदाजीस उतरलेल्या निकोलस पूरनने विजयी षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
पंजाबच्या फलंदाजांसमोर बेंगलोरच्या गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. बेंगलोरकडून केवळ युझवेंद्र चहलने १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ३९ चेंडूत ४८ धावांची सर्वाधिक खेळी केली. यामध्ये ३ चौकारांचा समावेश होता. यासोबतच ख्रिस मॉरिस (२५), शिवम दुबे (२३) आणि ऍरॉन फिंचने (२०) धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाज २० धावांच्या आतच तंबूत परतले.
पंजाबकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी आणि एम अश्विनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. यासोबतच अर्शदीप सिंग आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
बेंगलोरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पंजाबला २ गुण मिळाले. यासोबत त्यांचे पॉईंट्स टेबलमध्ये एकूण ४ गुण झाले आहेत. पंरतु ते अद्याप ८ व्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-केएल राहुलने कामगिरीच अशी केलीय की, ‘हे’ दोन दिग्गजही करतायेत तोंडभरुन कौतूक
-२ कोटींची किंमत मिळालेला हा खेळाडू किंग्स इलेव्हन पंजाबकडून पैसावसूल कामगिरी करण्यासाठी सज्ज
-किंग्स इलेव्हन पंजाबचा धुरंदर म्हणतोय, आयपीएलमध्ये न खेळण्यापेक्षा नियमांचे पालन करणे बरे
ट्रेंडिंग लेख-
-नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही
-IPL- दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये इशांत शर्माची जागा घेण्यास ३ खेळाडू तयार
-गौतम गंभीर का ठरला टीम इंडियासाठी संकटमोचक, हे दाखवून देणाऱ्या ३ खेळी