fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२-३ वर्षांचा गॅप राहूनही ठोकले अर्धशतक, आता स्वत:च्याच खेळीबद्दल वाटतंय आश्चर्य!

IPL 2020 RCB vs SRH AB De Villiers On Form I Surprised Myself To Be Honest

September 22, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


नवी दिल्ली। आयपीएलच्या १३ व्या हंगामातील तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, दुबई येथे सनरायझर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आरसीबीने विजय मिळविला. मागील ३ वर्षांमध्ये असे पहिल्यांदाच झाले, जेव्हा स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला नाही. या सामन्यादरम्यान आरसीबीचा अनुभवी फलंदाज एबी डिविलियर्सने शानदार अर्धशतक ठोकल्यामुळे तो आनंदी दिसला. संघाच्या विजयावर आणि आपल्या खेळीबद्दल बोलताना तो म्हणाला, दीर्घ काळानंतर पुनरागमन करणे चांगले वाटत आहे.

हैद्राबाद संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने देवदत्त पडिक्कल आणि डिविलियर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ बाद १६३ धावसंख्या उभारली होती. आरसीबीच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबाद संघ १९.४ षटकातच १५३ धावांवर सर्वबाद झाला होता. अशाप्रकारे बेंगलोरने हा सामना १० धावांनी जिंकला.

डिविलियर्स आपल्या खेळीबद्दल बोलताना म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं झालंं, तर मी स्वत: च्या कामगिरीने आश्चर्यचकित झालो आहे. मी दक्षिण आफ्रिकेत एक स्पर्धात्मक क्रिकेट खेळलो होतो, जो खूप चांगला होता. माझ्यासाठी हे आवश्यक होते की तिथे जाऊन खेळू आणि इथे आत्मविश्वास घेऊन येऊ. इथे भारत आणि ऑस्ट्रेलियाचे अनेक प्रतिभावान खेळाडू येत आहेत. आम्ही आज जॉश फिलिपला पाहिले. तो चांगला खेळाडू आहे.”

डिविलियर्सने हैद्राबादविरुद्ध खेळताना ३० चेंडूत ५१ धावांची खेळी केली. यामध्ये २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा १७० इतका होता. वेगवान धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. परंतु त्याने संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

“जेव्हा तुम्ही इथे खेळायला येता आणि तुम्ही अधिक क्रिकेट खेळलेला नसता, तेव्हा तुम्हाला स्वत:बद्दल शंका निर्माण होते. परंतु आम्ही एक संघ म्हणून मागील काही आठवड्यांपासून खूप मेहनत घेतली होती. आणि एक फलंदाज म्हणून फॉर्ममध्ये येण्यासाठीही सराव केला होता. आज रात्री आमची सुरुवात खूप सुखकार होती. दुर्दैवाने शेवटी मी धावबाद झालो. परंतु मी खूप आनंदी आहे की खेळाचे सर्व पैलू व्यवस्थित आहेत.”

डिविलियर्सने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना बांगलादेशविरुद्ध २०१७ मध्ये खेळला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या आजच्या सामन्यात ‘या’ दोन भावात होईल टक्कर

-‘या’ अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करताना झाली दुखापत; सोडावे लागले मैदान

-या स्टार खेळाडूंची प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवड न केल्यामुळे हैद्राबाद संघाला बसला फटका

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा


Previous Post

१९९२ क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे मार्टिन क्रो

Next Post

शून्यावर बाद होऊनही आयपीएलमध्ये फलंदाजाचे पहिल्यांदाच होतेय जोरदार कौतूक

Related Posts

Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/BBL
क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

January 23, 2021
क्रिकेट

ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! मोहम्मद सिराजने स्वतःलाच गिफ्ट केली महागडी कार; पाहा फोटो

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/Ajinkya Rahane
क्रिकेट

“५ महिने, २ देश अन् ८ शहर फिरून..”, घरी पतरल्यानंतर लेकीसोबतचा फोटो शेअर करत अजिंक्यने मांडल्या भावना

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

शून्यावर बाद होऊनही आयपीएलमध्ये फलंदाजाचे पहिल्यांदाच होतेय जोरदार कौतूक

Photo Courtesy: Twitter/ICC

पंचांच्या चुकीमुळे इतिहासात दुसऱ्यांदा कसोटी टाय झाली

हैद्राबाद संघावर आली डोकं धरायची वेळ, 'हा' अष्टपैलू खेळाडू पडू शकतो पूर्ण हंगामातून बाहेर

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.