शारजाह येथे शनिवारी (३१ ऑक्टोबर) आयपीएल २०२० चा ५२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना हैदराबाद संघाने ५ विकेट्सने जिंकला. या विजयासह हैदराबाद संघाने १२ गुण मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली. सोबतच ते प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहिले आहेत. हैदराबादच्या विजयाचा हीरो वेगवान गोलंदाज संदीप शर्मा ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले.
हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आणि बेंगलोरला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत केवळ १२० धावा घेतल्या. बेंगलोरचे हे आव्हान हैदराबाद संघाने ५ विकेट्स गमावत अवघ्या १४.१ षटकात पूर्ण केले.
हैदराबादकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. यामध्ये १ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच जेसन होल्डर आणि मनीष पांडेने २६ धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना युझवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ३.१ षटकात १९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबतच वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि इसरू उदानाने प्रत्येकी १ विकेट आपल्या खिशात घातली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून सलामीवीर फलंदाज जॉश फिलिपने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३१ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. त्याच्यासोबत एबी डिविलियर्स (२४) आणि वॉशिंग्टन सुंदरने (२१) धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीसह इतर फलंदाज २० धावांच्या आत तंबूत परतले.
हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना संदीप शर्मा आणि जेसन होल्डरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्यांनी प्रत्येकी २ विकेट्सवर आपले नाव कोरले. संदीपने देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट घेतली, तर होल्डरने ख्रिस मॉरिस आणि इसरू उदानाला तंबूत पाठवले. याव्यतिरिक्त टी नटराजन, शाहबाज नदीम आणि राशिद खानने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
-दुष्काळात तेरावा महिना ! हैदराबादचा ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
-‘अंपायरचा निर्णय चुकला,’ SRH Vs RCB सामन्यानंतर सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा काय आहे प्रकरण
-ज्या गोष्टीसाठी कॅप्टन्सी सोडली त्यातच फ्लॉप, माजी खेळाडूची दिनेश कार्तिकवर खोचक टीका
ट्रेंडिंग लेख-
-राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट
-IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश
-सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार