fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण ‘या’ ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम

Rohit Sharma, Dinesh Kartik And Shane Watson Are The Only Captains Who Hit Century In UAE Ipl Match

August 6, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा १३वा हंगाम यावेळी युएईत खेळला जाणार आहे. भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे यंदा आयपीएलचे आयोजन भारताबाहेर केले जात आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२०ची सुरुवात होणार तर अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.

तत्पुर्वी युएईमध्ये आयपीएलची सर्व तयारी झाली आहे. युएईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील सर्व खेळपट्टी पूर्णपणे तयार करण्यात आल्या आहेत, जिथे आयपीएलचे अनेक खेळाडू आपले जबरदस्त प्रदर्शन दाखवतील.

पण, युएईतील क्रिकेट मैदाने आयपीएलच्या बऱ्याच कर्णधारांसाठी अनलकी ठरली आहेत. तेथील खेळपट्टीवर अधिकतर कर्णधार बॅटने त्यांचा जलवा दाखवण्यात अयशस्वी ठरले आहेत. २०१४ साली भारतात निवडणुका चालू असल्यामुळे आयपीएलमधील २० सामने युएईमध्ये खेळले गेले होते. पण, युएईमध्ये आयपीएलच्या ८ संघातील कर्णधार जास्त विशेष कामगिरी करु शकले नाहीत.

युएईत आतापर्यंत केवळ ३ कर्णधार अर्धशतक करण्यात यशस्वी ठरले आहेत. यावरुन आपण अंजाद लावू शकतो की, युएईतील मैदाने कर्णधारांसाठी किती अनलकी राहिली आहेत. Rohit Sharma, Dinesh Kartik And Shane Watson Are The Only Captains Who Hit Century In UAE Ipl Match

रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि शेन वॉटसन हेच ते ३ कर्णधार आहेत, ज्यांना युएईत अर्धशतक करता आले आहे. २०१४ साली सर्वप्रथम युएईत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा दिल्ली डेअरडेविल्सचा तत्कालीन कर्णधार दिनेश कार्तिकने केला होता. त्याने १९ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात ४० चेंडूत ५६ धावा केल्या होत्या. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाने केकेआरने दिलेले १६७ धावांचे आव्हान ३ चेंडू राखून पूर्ण केले होते आणि तो सामना ४ विकेट्सने जिंकला होता.

त्यानंतर २० एप्रिल २०१४ ला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसनने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध तूफानी अर्धशतकी खेळी केली होती. त्याने फक्त २९ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाने ५ विकेट्स गमावत विरुद्ध संघाला १९२ धावांचे आव्हान दिले होते. पण, किंग्स इलेव्हन पंजाबने ८ चेंडू राखून आव्हान पूर्ण केले होते आणि ७ विकेट्सने तो सामना जिंकला होता.

तर, २५ एप्रिल २०१४ ला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ४१ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे संघ १४१ धावांचा स्कोर उभा करु शकला होता. सीएसकेने ६ चेंडू राखून ७ विकेट्सने तो सामना जिंकला होता.

कार्तिक, वॉटसन आणि रोहितव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाचे कर्णधार युएईतील आयपीएल सामन्यात अर्धशतकी खेळी करु शकले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन

जाणून घ्या रोहित शर्माची पहिली कमाई किती होती आणि ती कशी खर्च केली ?

…म्हणून सोशल मीडियावर विराट कोहलीची केली जात आहे चेष्टा

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप

चौथ्या क्रमांकानंतर फलंदाजीला येत २५ ओव्हरच्या आत शतक करणारे जगातील २ अवलिया क्रिकेटर

एकाच वनडे सामन्यात दोनही कर्णधारांनी ५ वेळा केली आहेत खणखणीत शतकं, कोहलीने तर


Previous Post

वाढदिवस विशेष: अफाट लोकप्रियतेचा धनी ठरलेला पण तितकाच वादग्रस्त जेसी रायडर

Next Post

श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/BBL
क्रिकेट

व्हिडिओ: धाव घेताना फलंदाजाची गोलंदाजांशी घातक टक्कर, त्यानंतर घडलं असं काही की तुम्ही कराल कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/ virendersehwag
क्रिकेट

स्वागत नहीं करोगे? आपल्या गावात परतल्यानंतर टी नटराजनचे मिरवणूक काढून जंगी स्वागत

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/mipaltan
क्रिकेट

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ

January 21, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते

Photo Courtesy: Twitter/SAIMedia

"टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील," बजरंग पुनिया

Photo Curtesy: Twitter/ Mipaltan & IPL

४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.