आयपीएल २०२० चा अकरावा सामना मंगळवारी (२९ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना हैदराबाद संघाने १५ धावांनी जिंकला आणि या हंगामातील पहिला विजय आपल्या नावावर केला. या सामन्यादरम्यान दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरवर स्लो ओव्हर रेटसाठी (षटकांची गती कमी राखल्यामुळे) कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी त्याला १२ लाख रुपयांचा भला मोठा दंड आकारण्यात आला आहे.
अय्यरसाठी हा दुसरा मोठा झटका आहे. पहिला झटका असा की, त्याच्या संघाला या हंगामात पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबाद संघाने त्यांना सहजपणे पराभूत केले आणि त्यानंतर अय्यरवर दंड आकारण्यात आला.
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, “ही श्रेयस अय्यरच्या (दिल्ली कॅपिटल्स) संघाची या हंगामातील पहिली चूक आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटसाठी त्याच्यावर १२ लाख रूपयांचा दंड लावला आहे.”
यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीवरही किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना स्लो ओव्हर रेटसाठी दंड लावण्यात आला होता. बेंगलोरने २० षटके गोलंदाजी करण्यासाठी जवळपास २ तास लावले होते. त्यामुळे विराटवर दंड आकारण्यात आला होता. विराटवरही १२ लाख रुपयांचा दंड लावला होता.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला ७ विकेट्स गमावत केवळ १४७ धावाच करता आल्या होत्या.
.@SunRisers register their first win of #Dream11IPL 2020 as they beat #DelhiCapitals by 15 runs in Match 11
A look at the Match Summary below 👇#DCvSRH pic.twitter.com/OWyZdkhenD
— IndianPremierLeague (@IPL) September 29, 2020
यादरम्यान दिल्ली संघात इशांत शर्माचे पुनरागमन झाले आहे, तर हैदराबाद संघात केन विलियम्सनचे पुनरागमन झाले आहे. विलियम्सनने या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात ४१ धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलमध्ये चालतेय राशिद खानची जादू, केलाय ‘हा’ मोठा विक्रम
-११ सामन्यानंतर आयपीएल२०२०चा असा आहे पॉईंट टेबल
-दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर विलियम्सन, रशीद नाही तर ‘या’ भारतीयाचे डेविड वॉर्नरने केले कौतुक
ट्रेंडिंग लेख-
-चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-सुपर ओव्हरमध्ये विराट कोहलीच्या बेंगलोर संघाने जिंकलेत ‘हे’ २ सामने