आयपीएल २०२० च्या २२ व्या सामन्यात गुरुवारी (८ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद संघाने किंग्स इलेव्हन पंजाबला ६९ धावांनी पराभूत केले. या हंगामातील हा हैदराबाद संघाचा तिसरा विजय होता. हैदराबादच्या या विजयात जॉनी बेयरस्टोने मोलाचे योगदान दिले. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत २०१ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाचा डाव १६.५ षटकात १३२ धावांवर संपुष्टात आला.
पंजाबकडून फलंदाजी करताना निकोलस पूरनने चांगली कामगिरी केली. त्याने ३७ चेंडूत सर्वाधिक ७७ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ५ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. सोबतच कर्णधार केएल राहुल आणि सिमरन सिंग यांनी ११ धावांची खेळी केली. इतर खेळाडूंना २ आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त खलील अहमद आणि टी नटराजन या गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर अभिषेक शर्माने १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीस उतरलेल्या हैदराबाद संघाकडून फलंदाजी करताना धडाकेबाज फलंदाज जॉनी बेयरस्टोने ५५ चेंडूत सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली. यामध्ये ६ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे. त्याच्यासोबतच कर्णधार डेविड वॉर्नरने ५० धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त केन विलियम्सन (२०*) आणि अभिषेक शर्मा (१२) या दोघांनाच २ आकडी धावसंख्या पार करता आली.
पंजाबकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अर्शदीप सिंगने (२) आणि मोहम्मद शमीने (१) विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिंचला मंकडींगने बाद न करण्याचे कारण आले समोर; स्वत: अश्विनने केला खुलासा
-करुन दाखवलं! वॉर्नरने आयपीएलमध्ये जे केलंय ते ना विराट ना रोहितला जमलंय
-‘सिंह म्हातारा झालाय, शिकार करणं विसरला नाही’, धोनीचा कॅच पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
-IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ