मुंबई । इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही जगातली सर्वात मोठी टी20 क्रिकेट लीग मानले जाते. जगातील सर्वोत्तम खेळाडू या लीगमध्ये भाग्य फलंदाजी आणि गोलंदाजीने उत्कृष्ट प्रदर्शन करतात. आपल्या संघाची कामगिरी उत्तम व्हावी, यासाठी आयपीएल फ्रेंचायझींनी वारेमाप पैसा खर्च करून अत्यंत महागडे खेळाडू आपल्या संघात घेतले आहेत. यंदाच्या काही खेळाडूंची कमाई त्यांच्या कर्णधारापेक्षा ही जास्त आहे. आपल्या कर्णधारांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या कमाईवर एक नजर टाकूया.
दिल्ली कॅपिटल्स –
दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व यंदाही श्रेयस श्रेयसकडे कायम आहे. त्याला सात कोटी रुपयात कायम केले आहे. तथापि, त्याच्या संघात असे काही खेळाडू आहेत जे त्यांच्यापेक्षा जास्त पगार घेतात. यातील पहिले नाव यष्टिरक्षक फलंदाज रीषभ पंत असून त्याला 15 कोटी मिळतात. पंतची ही रक्कम रोहित शर्मा आणि एमएस धोनीच्या बरोबरीची आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा माजी कर्णधार आर.अश्विन या हंगामात दिल्ली कॅपिटल्समध्ये दाखल झाला आहे. त्याला लिलावाआधी झालेल्या ट्रेडिंह विंडोमध्ये 7.60 कोटी रुपयांमध्ये दिल्लीने आपल्या संघात घेतले. अश्विनलाही अय्यरपेक्षा जास्त पगार मिळणार आहे.
कर्णधार श्रेयस अय्यरपेक्षाही जास्त पैसे घेणार्या खेळाडूंमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये असलेले शेमरॉन हेटमायरही आहे. संघाने त्याला 7.75 कोटी रुपये देऊन संघात जोडले.
कोलकाता नाईट रायडर्स –
गेल्या वर्षी झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाज पॅट कमिन्सचा संघात समावेश केला होता. केकेआरने कमिन्ससाठी घसघशीत 15.50 कोटी रुपये मोजत त्याला संघात घेतले. मात्र संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकला यंदा 7.40 कोटी रुपये मिळणार आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सच्या स्टार खेळाडूंमध्ये आंद्रे रसेल आहे. रसेलने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या हंगामात हा संघ रसेलला 8.50 कोटी रुपये देणार आहे. रसेलने आयपीएल 2019 दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सला ऐतिहासिक कामगिरी केली होती.