नवी दिल्ली। चेन्नई संघाने आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांपैकी केवळ २ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ५ सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. त्यानंतर भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या खराब कामगिरीवर निशाना साधला आहे.
सेहवाग म्हणाला की, त्याला चेन्नई संघाच्या चाहत्यांसाठी वाईट वाटते. कारण त्यांचा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध आयपीएलमधील पाचवा सामना पराभूत झाला. तो पुढे म्हणाला की, आतापर्यंत प्रत्येक संघाविरुद्ध चेन्नई संघाचा दबदबा राहिला होता. परंतु यावर्षी त्यांची फलंदाजी फळी फार चांगली कामगिरी करताना दिसत नाही.
सेहवागने केले ट्वीट
सेहवागने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून लिहिले की, “मला चेन्नईच्या चाहत्यांसाठी वाईट वाटते. हा एक असा संघ होता, जो शेवटपर्यंत लढत होता आणि विरोधी संघांसाठी धोका बनायचा. परंतु यावर्षी चेन्नईने खूप निराश केले आहे. विशेषत: त्यांच्या फलंदाजीने. विराट चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळी केली. त्याने केवळ ५ चेंडू निर्धाव खेळले. फलंदाजांनी त्याच्याकडून शिकले पाहिजे.”
Feel sad for Chennai fans.
This was a team that fought & teams used to be wary till the end. Have been very disappointing especially with d bat, leaving it for too late.
Kohli was extra special today. Many batsmen can learn how to not get bogged down,played only 5 dots#CSKvsRCB pic.twitter.com/9AKFBan6F0— Virender Sehwag (@virendersehwag) October 10, 2020
यापूर्वीही वीरेंद्र सेहवागने साधलाय निशाना
यापूर्वीही सेहवागने चेन्नई संघाच्या फलंदाजांची तुलना सरकारी नोकरीशी केली होती. त्याने म्हटले होते की, चेन्नईचे काही फलंदाज फ्रँचायझीला ‘सरकारी नोकरी’प्रमाणे समजतात. त्यामध्ये कामगिरी केली नाही तरीही पगार मिळत राहतो.
चेन्नई संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आह. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघ आठ वेळा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पाचव्या पराभवानंतर एमएस धोनीचा चेन्नई संघ झाला जोरदार ट्रोल; पाहा काही खास ट्विट्स
-RCB च्या भेदक माऱ्यापुढे CSK गपगार, बेंगलोरचा ३७ धावांनी विजय; चेन्नईचा पुढचा प्रवास खडतर
-Video : ‘या’ भारतीय खेळाडूच्या डान्स स्टाईलपुढे ब्रावो-गेलदेखील पडतील फिके
ट्रेंडिंग लेख-
-“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास?