चार वेळा आयपीएल विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्समध्ये चांगल्या खेळाडूंची कमतरता नाही. या संघाच्या प्रत्येक विभागात, दिग्गज खेळाडू आहेत आणि सर्व एकापेक्षा एक प्रतिभावान आहेत. परंतु त्यांच्यातील सर्वात धोकादायक खेळाडू म्हणजेच सर्वोत्कृष्ट कोण? हे सांगणे कठीण काम आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने मुंबई संघातील सर्वात धोकादायक खेळाडूचे नाव सांगितले आहे.
दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला लीग सामना ११ ऑक्टोबरला खेळायचा आहे. परंतु त्याआधी पाँटिंगने सांगितले आहे की त्यांच्या संघाला कोणत्या खेळाडूपासून सावध राहावे लागेल. पाँटिंग म्हणाला की, मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक खेळाडू हा संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे.
रोहितचं पाँटिंगने तोंडभरून कौतुक केले आणि म्हणाला की या मोसमात तो मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक फलंदाज आहे.
पाँटिंग म्हणाला की, रोहित शर्मा टी२० क्रिकेटमधील जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा आयपीएल, त्याची कामगिरी चांगली आहे. तो पुढे म्हणाला की रोहित सध्या आपल्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यातून जात आहे.
पाँटिंग मुंबई इंडियन्स संघाकडूनही खेळला आहे आणि या संघाचा प्रशिक्षकही राहिला आहे. तो रोहितला खूप जवळून ओळखतो. रोहितला पाँटिंगनंतरच मुंबईचे कर्णधारपद मिळाले आणि रोहितने त्याच्या नेतृत्वात संघाला चार वेळा चॅम्पियन बनवलं आहे.
दुसरीकडे रोहित शर्माने या हंगामात आपल्या संघासाठी सलामीवीराची भूमिका निभावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आबु धाबी येथे १९ सप्टेंबरला म्हणजेच आज आपला पहिला सामना खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश
-अखेर ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळणार की नाही याचे उत्तर मिळाले
-काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून ‘त्याने’ केला क्रिकेटला टाटा बाय बाय
ट्रेंडिंग लेख-
-‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी