इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021)ला पुढील महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून सुरू होणार असून यासाठी अनेक संघांनी सराव सुद्धा सुरू केला आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी त्यांच्या संघातील परदेशी खेळाडू कधीपर्यंत भारतात दाखल होणार आहे, याबद्दल माहिती दिली आहे. आरसीबीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हेसन यांनी ही माहिती दिली आहे.
आयपीएल गव्हर्निंग कांऊसीलने या टी20 लीगचे वेळापत्रक या महिन्याच्या सुरूवातीलाच जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत 6 ठिकाणी सामने खेळले जातील आणि यावेळी कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार नाही.
या स्पर्धेच्या 14 व्या हंगामाचा अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबाग येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. त्याच ठिकाणी प्लेऑफचे सामने देखील खेळले जातील. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.
RCB’s IPL 2021 Camp and Player Availability
When’s the pre-season camp starting? When are the overseas players arriving? On @myntra presents Bold Diaries, Mike Hesson leaves no room for speculations ahead of #VivoIPL2021.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #Classof2021 pic.twitter.com/yxBFNYVwW8
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 24, 2021
एबी डिव्हिलियर्स 28 मार्च रोजी आयपीएलसाठी दाखल होणार असून 1 एप्रिलपर्यंत सर्व खेळाडूंना त्यांच्या ठिकाणाहून येथे पोहोचण्यास मदत करणार आहेत, असे हेसन यांनी सांगितले.
हेसन म्हणाले की, “मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खूपच वेगळे आहे. कारण मागील वर्षी आपणास प्रत्येकाला बराच काळ अप्रशिक्षित किंवा न खेळता बसावे लागले होते. मात्र यावेळेस हे वेगळे आहे, आम्हाला खेळाडू मिळाले असून यावेळी आम्ही कसून सराव करणार आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडला बसू शकतो धक्का; कर्णधार मॉर्गनबरोबरच ‘हा’ खेळाडू दुसऱ्या वनडेला मुकण्याची शक्यता
हार्दिक आणि कृणालने आज जगभरात ओळख मिळवली, पण त्यासाठी वडीलांनी घेतले होते अपार कष्ट
वनडे क्रमवारी: विराट कोहली अव्वल क्रमांकावर कायम, मात्र रोहित शर्मा…