आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तिसऱ्या सामन्यात रविवारी(११ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना केकेआरशी होईल. हैदराबादने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संघ सलग पाच हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचला असून, मागील हंगामात हा संघ क्वालिफायरमध्ये पराभूत झाला होता. दुसरीकडे, केकेआरचा संघ मागील वर्षी साखळी फेरीतून बाहेर पडलेला. अशा परिस्थितीत केकेआरसाठी विजय मिळवणे सोपे राहणार नाही.
पॉवर प्लेमध्ये हैदराबाद वरचढ
आयपीएलच्या शेवटच्या दोन हंगामातील पॉवर प्लेविषयी बोलताना सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक धावा केल्या आहेत. यावेळी संघाने ८.८० च्या धावगतीसह १६४१ धावा केल्या. दुसरीकडे केकेआर ७.५१ च्या धावगतीने केवळ १२६७ धावा करू शकला. म्हणजेच हैदराबादची पॉवर प्लेमधील कामगिरी केकेआरपेक्षा चांगली आहे. हैदराबाद पॉवरप्लेमध्ये सरासरी ५३ धावा करत आहे. तर, केकेआरचा संघ केवळ ४५ धावा करू शकला. हैदराबादच्या वतीने कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला वेगवान सुरुवात दिली आहे.
पॉवर प्ले दरम्यान हैदराबादने गेल्या दोन सत्रात सर्वात कमी २६ बळी गमावले. इतर सर्व ७ संघांनी ३० किंवा त्याहून अधिक बळी गमावले आहेत. दुसरीकडे, केकेआरने पॉवर प्लेमध्ये ४४ गडी गमावले आहेत. म्हणजेच पहिल्या सहा षटकांत केकेआर अधिक बळी गमावत आहे. यामुळे संघाची कामगिरी चांगली राहिली नाही. हैदराबादने एकदा तर केकेआरने दोन वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे.
केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील एकूण आकडेवारीचा विचार केल्यास केकेआर सरस आहे. उभय संघांमध्ये आत्तापर्यंत १९ सामने झाले असून यामध्ये १२ सामन्यात केकेआरने विजय संपादन केला आहे. तर, हैदराबाद फक्त ७ सामन्यात विजय मिळवू शकला. मागील हंगामात खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात केकेआरला विजय मिळाला होता. त्यापैकी एक सामना सुपर ओवरमध्ये खेळला गेलेला. यावर्षी हैदराबादचे नेतृत्व पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नर करेल. मागील हंगामात निम्म्यातून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणारा ओएन मॉर्गन केकेआरचे कर्णधारपद भूषवेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ ..तर माझी पत्नी मला घटस्फोट देईल’, पाँटिंगने सांगितले अजब कारण
व्हिडिओ: भर सामन्यात जडेजाने दिल्लीच्या गोलंदाजाला घातली धसकी, डोळे मोठे करत दाखवली भिती!