आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. कर्णधार रोहित शर्मा देखील अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. मुंबई इंडियन्सने चालू हंगामात सुरुवातीच्या आठ सामन्यांपैकी एकही जिंकला नाहीये. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्सने खेळलेला शेवटचा सामना ३६ धावांनी गमावला. या अशा खराब प्रदर्शनानंतर रोहित शर्मा त्याच्या आवडत्या फुटबॉल संघाला समर्थन दिल्यामुळे ट्रोल होत आहे.
सर्वाधिकवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी चालू हंगाम एखाद्या भयानक स्वप्नासारखा राहिला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील अगदी खराब फॉर्ममध्ये दिसला आहे. चाहतेही त्याच्या प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मुंबईने त्यांचा शेवटचा सामना २४ एप्रिलला खेळला आहे आणि पुढचा सामना ३० एप्रिलला खेळायचा आहे. यादरम्यान संघातील खेळाडूंना विश्रांती घेण्याचा चांगला वेळ मिळाला आहे. याच कारणास्तव रोहित त्याचा आवडता फुटबॉल संघ रिअल माद्रिदचे समर्थन करताना दिसला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मंगळवारी (२६ एप्रिल) यूएफा चॅम्पियन्स लीग २०२२च्या लेग-१चा उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात मॅनचेस्टर सिटी आणि रिअल माद्रिद (Real Madrid) हे दोन संघ आमने-सामने होते. मात्र, याठिकाणी देखील रोहित सपोर्ट करत असलेल्या माद्रिद संघाला ४-३च्या फरकाने पराभव मिळाला. अशात टीकाकारांना रोहितला ट्रोल करण्यासाठी अधिकच भांडवल मिळाले. या फुटबॉल सामन्यादरम्यान रोहितने एक ट्वीट केले होते. ट्वीटमध्ये रोहितने लिहिले होते की, “कम ऑन माद्रिद.”
Come on Madrid @realmadrid
— Rohit Sharma (@ImRo45) April 26, 2022
आयपीएल २०२२ हंगामात रोहितच्या नेतृत्वातील संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. याच कारणास्तव चाहते त्याच्यावर चांगलेच नाराज आहेत. अशातच मंगळवारी जेव्हा रोहितचा आवडता फुटबॉल संघ पराभूत झाला, तेव्हा चाहते सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागले.
Madrid be like: pic.twitter.com/q0tTYUWnVq
— Sahil Chawla🇮🇳 (@SahilChawla93) April 26, 2022
https://twitter.com/TxixiTaka/status/1519049247932715009?s=20&t=Jq8YS6rPQkhVTYa0I3Xgfg
एका नेटकऱ्याने रोहितचा वडा पाव अशा उल्लेख करत लिहिले की, “तुम्हाला स्वतःला एक सामना देखील जिंकता येत नाहीये.” तसेच, दुसऱ्या एका नेटकऱ्याने सांगितले की, “आता तर रिअल माद्रिद देखील पराभूत झाला आहे.”
रोहितविषयी अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हैदराबादच्या फलंदाजी फळीत जोकर’, विलियम्सन ५ धावांवर बोल्ड झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
पंचांसोबत वाद आणि राजस्थानविरुद्धचा पराभव पचवण्यासाठी लागले ‘एवढे’ दिवस, वॉटसनचा खुलासा
माही आजही मास्टर! माजी दिग्गजाने केले मान्य, धोनीपेक्षा सरस कोणीही नाही; वाचा मन जिंकणारे वक्तव्य