इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत. २६ मार्चपासून ही लीग सुरू होणार आहे. त्यापुर्वी सर्व संघ तयारीला लागले आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. सीएसके संघासाठी संघाचे संयोजन हा सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरला दूखापत झाल्यामुळे संघाचे संयोजन होत नाहीये.
सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड दूखापतीतून बाहेर येऊन सध्या सराव करत आहे आणि तो संघाच्या निवडीसाठी सध्या उपलब्ध आहे. सीएसके संघासमोर सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित केला जात आहे की, संघात फाॅफ डु प्लेसीसचे(Faf du Plessis) स्थान कोण घेणार? भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठानने याबद्दल आपले मत मांडले आहे. त्याने सांगितले आहे की संघात डु प्लेसीसची जागा कोण घेणार?
सीएसकेचा सलामी फलंदाज म्हणून विदेशी खेळाडूला संधी देऊ शकतो. सलामीसाठी न्यूझीलंडचा डे्वन काॅनवेला(Devon Conway) संधी दिली जाऊ शकते. सीएसकेने त्याला १ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते, आयपीएलच्या अगामी हंगामात तो पदार्पण करू शकत. इरफान पठान म्हणाला की, महाराष्ट्राचे कंडीशन काॅनवेला सूट होईल. इरफान पठानने दूसरा पर्याय म्हणून राॅबिन उथप्पाचे (Robin Uthappa) सुद्धा नाव समोर ठेवले आहे.
भारताचा माजी अष्टपैलू म्हणाला, “सीएसकेकडे दोन पर्याय आहेत. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डे्वन काॅनवे एक पर्याय आहे. सीसीआयच्या खेळपट्टी चांगल्या आहेत. एक विदेशी खेळाडू म्हणून काॅनवे या खेळपट्ट्यांवर सहज खेळू शकतो. जर काॅनवेला संधी दिली नाही, तर राॅबिन उथप्पा चांगली खेळू करु शकेल. तो एक शानदार सलामीवीर आहे.”
आयपीएलचा हा १५ वा हंगाम असणार आहे. यावर्षी आयपीएलमध्ये १० संघांचा समावेश करण्यात आला असून आयपीएलचे स्वरुप सुद्धा बदलण्यात आले आहे. १० संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. आयपीएलचे सर्व सामने पुणे आणि मुंबईमध्ये खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बॉक्स क्रिकेट ते फुल व्हॉलीबॉल; ‘एमआय अरेना’मध्ये पलटणची धमाल मस्ती, व्हिडिओ बनवेल तुमचा दिवस
INDW vs BANW | ‘करा अथवा मरा’ लढतीसाठी उतरणार टीम इंडिया, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही