कोलकाता नाईट रायडर्सचा महत्वाचा अष्टपैलू वेंकटेश अय्यरने आयपीएल २०२२मध्ये चाहत्यांची चांगलीच निराशा केली. याचाचा परिणाम म्हणूनच केकेआरने सोमवारी (दि. ०२ मे) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून त्याला वगळले. मागच्या हंगामात संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या वेंकटेशच्या जागी केकेआरने अष्टपैलू अनुकूल रॉयला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली.
आयपीएल २०२१मध्ये वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) अप्रतिम प्रदर्शन करून संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला होता. याच पार्श्वभूमीवर फ्रँचायझीने चालू हंगामासाठी त्याला ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. परंतु त्याने या हंगामात फ्रँचायजीच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. वेंकटेशने चालू हंगामात खेळलेल्या सुरुवातीच्या ९ सामन्यांमध्ये १६.५०च्या सरासरीने अवघ्या १३२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागच्या वर्षी केकेआरकने वेंकटेशला आयपीएल पदार्पणाची संधी दिली होती. त्या हंगामात वेंकटेशने खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ४१.११च्या सरासरीने ३७० धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार अर्धशतके निघाले होते. या धावा त्याने १२८.४७च्या सरासरीने केल्या होत्या. वेंकटेशने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही योगदान दिले होते. आठ सामन्यांमध्ये गोलंदाजी केल्यानंतर त्याला ३ विकेट्स मिळाल्या होत्या. मागच्या हंगामात केकेआरला मिळालेल्या यशासाठी कारणीभूत ठरलेला वेंकटेश अय्यर चालू हंगामात मात्र त्यांच्या अपयशाचे कारण ठरला आहे.
चालू आयपीएल हंगामात केकेआरने मागच्या हंगामाच्या तुलनेत खूपच निराशाजनक प्रदर्शन केले आहे. मागच्या पाच सामन्यात केकेआरने लागोपाठ पराभव स्वीकारला आहे. हंगामातील सुरुवातीच्या ९ सामन्यांपैकी अवघे तीन सामने संघाला जिंकता आले आहेत, तर राहिलेल्या ६ सामन्यात त्यांनी पराभव स्वीकारला आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना खेळलेली प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स-
जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन.
कोलकाता नाईट रायडर्स-
ऍरॉन फिंच, सुनील नारायण, श्रेयस अय्यर (कर्णधार), बाबा इंद्रजित (यष्टीरक्षक), नितीश राणा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, उमेश यादव, टिम साऊदी, शिवम मावी.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमरानच्या सुपरफास्ट चेंडूवर ऋतुराजचा ‘लय भारी’ षटकार; गोलंदाजाची रिऍक्शन पाहण्यासारखी
सुपरमॅन बनत रिझवानचा हवेत एकहाती झेल, अद्भुत कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल