रविवारी (१५ मे) आयपीएलच्या डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ भिडले. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि शेवटी सामना देखील जिंकला. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर या सामन्यात अपयशी ठरला, पण दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वालने मात्र डावाची चांगली सुरुवात करून दिली. यादरम्यान जयस्वालने एक षटकार असा मारला, ज्यामुळे पंचांना सामना सुरू ठेवण्यासाठी नवीन चेंडू मागवावा लागला.
जोस बटलर (Jos Buttler) ६ चेंडूत २ धावा करून बाद झाला, पण यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) मात्र मोठी खेळी करून संघाचा चांगली सुरूवात देऊ शकला. जयस्वालने २९ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४१ धावा केल्या. जयस्वाल राजस्थानसाठी या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला. राजस्थानच्या डावात पॉवरप्लेचे शेवटचे षटक श्रीलंकन गोलंदाज दुष्मंता चमीरा (Dushmantha Chameera) घेऊन आला होता. या षटकात जयस्वालने त्याला लक्ष केले आणि तब्बल २१ धावा कुटल्या.
याच षटकात जसस्वालने हा अप्रतिम षटकार मारला. त्याने हा शॉट स्टेडियमच्या बाहेर मारल्यामुळे चेंडू सापडू शकला नाही आणि पंचांना नवीन चेंडू घ्यावा लागला. या षटकाराची लांबी १०३ मीटर सांगितली गेली. उभय संघातील हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. हे स्टेडियम कमी जागेत उभे केले गेले आहे आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टॅन्ड देखील खूप उंच नाहीत. त्यामुळे जयस्वालने मारलेल्या शॉटवर चेंडू सहज स्टेडियमच्या बाहेर गेला.
https://twitter.com/credbounty/status/1525849069041557505
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ६ विकेट्सच्या नुकसानावर १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ मर्यादित २० षटाकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १५४ धावा करू शकला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्डने ४ षटकांमध्ये १८ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कोण आहे ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पथिराना, ज्याने सीएसकेकडून केले दिमाखात आयपीएल पदार्पण
Video: ओव्हरस्मार्ट बनायला निघालेल्या जोस बटलरची फजिती, आवेश खानने केले क्लिन बोल्ड
राजस्थानने लखनऊचा उडवला धुव्वा, २४ धावांनी सामना जिंकत प्लेऑफसाठीचा दावा केला मजबूत