मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २४ सामने पूर्ण झाले असून आता २५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात संघात होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल २०२२ हंगामातील सहावा सामना असणार आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादचा हा पाचवा सामना असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२२ हंगामात पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. तसेच सनरायझर्स हैदराबादने चार पैकी दोन सामने जिंकले आहेत.
असे असू शकतात संभावित संघ
आयपीएलच्या १५ व्या हंगामात कोलकाता नाईट रायजर्स संघाने श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली आहे. त्यांना आता सहावा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी कोलकाताचा संभावित ११ जणांचा संघ (KKR Predicted XI) कसा असू शकतो याचा आढावा घेऊ.
कोलकाता सलामीसाठी वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यावरच सलामीसाठी विश्वास ठेऊ शकतात. तसेच मधल्या फळीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर, नितीश राणा, यष्टीरक्षक सॅम बिलिंग्स यांची निवड होऊ शकते. अष्टपैलू खेळाडूंसाठी आंद्रे रसेल आणि सुनील नारायणला पसंती मिळू शकते, तर गोलंदाजीत पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक दार आणि वरुण चक्रवर्ती यांची निवड होऊ शकते.
केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पण नंतर संघाने चांगले पुनरागमन करत सलग २ विजय मिळवले. आता सनरायझर्स हैदराबादला पाचवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आपल्या ११ जणांच्या संघात (SRH Predicted XI) फारसा बदल करण्याची शक्यता कमी आहे.
हैदराबादकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विलियम्सन उतरू शकतात. तसेच मधल्या फळीत राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, यष्टीरक्षक निकोलस पूरन आणि शशांक सिंग यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू म्हणून श्रेयस गोपाळ आणि मार्को जेन्सेन यांची निवड होण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक यांचे चांगले पर्याय आहेत.
आमने-सामने
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders) संघात आत्तापर्यंत २१ सामने झाले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबादला ७ सामने जिंकले आहेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्स १४ सामने जिंकले आहेत.
खेळपट्टी आणि हवामान
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium, Mumbai) सामना होणार आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याचे आत्तापर्यंतच्या सामन्यांतून दिसत आहे. या सामन्यादरम्यान मुंबईतील वातावरण उष्ण असेल. तापमान २८ ते २९ डिग्री सेल्सियस असेल. तसेच ७० ते ७५ टक्के आद्रता असण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) हैदराबाद विरुद्ध कोलकाता (SRH vs KKR) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामना १५ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामना ब्रेबॉर्न येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडेन मार्करम, शशांक सिंग, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक, टी नटराजन, श्रेयस गोपाल, अब्दुल समद, सीन ऍबॉट, रविकुमार समर्थ, जगदीशा सुचित, ग्लेन फिलिप्स, विष्णू विनोद, प्रियम गर्ग, कार्तिक त्यागी, रोमॅरियो शेफर्ड, फजलहक फारुकी, सौरभ दुबे.
कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, सुनील नरेन, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती, टीम साऊदी, मोहम्मद नबी, शिवम मावी, ऍरोन फिंच, शेल्डन जॅक्सन, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीथ, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, प्रथम सिंग, अभिजीत तोमर, अमन हकीम खान, अशोक शर्मा, रमेश कुमार.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| हैदराबाद वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
कौतुक करावं तेवढं कमीच! ३ षटकार अन् ८ चौकारांसह बटलरची वेगवान फिफ्टी, पटकावला ‘हा’ क्रमांक