शनिवारी (१२ फेब्रुवारी) आणि रविवारी (१३ फेब्रुवारी) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावाबाबत राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) संघमालक मनोज बदाले (manoj badale) यांनी आयपीएल मेगा लिलावाविषयी (IPL mega auction) मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सला इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला पुन्हा एकदा संघात घेता आले नाही. या लिलावात मुंबई इंडियन्सने आठ कोटी खर्च करून आर्चरला विकत घेतले. राजस्थान रॉयल्ससाठी ही निराशाजनक बाब आहे, परंतु, बदालेंच्या मते त्यांना भारतीय खेळाडूंचा एक मजबूत संघ तयार केला आहे.
बदालेंनी सांगितल्याप्रमाणे राजस्थान रॉयल्स मेगा लिलावात एका विशिष्ट विचारासह उतरला होता, जो त्यांनी साध्य केला आहे. ते म्हणाले की, “यावर्षी आमचे लक्ष्य भारतीय खेळाडूंचा मजबूत संघ तयार करणे होते. रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, करुण नायर, नवदीप सैनी, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा यांच्याव्यतिरिक्त आधीपासून संघात सहभागी असलेले संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांच्या रूपात आम्ही ही गोष्ट साध्य करू शकलो.”
“आमचा प्रयत्न नेहमी विश्वस्तरीय प्लेइंग इलेव्हन तयार करणे असतो. ही गोष्ट यातून स्पष्ट होते की, आम्ही संघावर सुरुवातीलाच आमचा अधिकांश पैसा वापरण्याचा प्रयत्न केला. आम्ही पूर्ण प्रयत्न केला की, ओळखीच्या चेहऱ्यांना निवडले जावे, ज्यांना आम्ही पुन्हा एकदा रॉयल्समध्ये पाहू इच्छितो. आम्ही अनेक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विकत घेतले आणि त्यांना संघाच्या जर्सीमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहोत,” असे बदाले पुढे बोलताना म्हणाले.
आर्चरला पुन्हा विकत घेता आले नाही, यामुळे बदाले निराश आहेत. परंतु, त्याला विकत घेतले असते, तर इतर संघावर त्याचा परिणाम झाला असता. बदाले म्हणाले की, “तो मागच्या काही वर्षांपासून आमच्या संघाचा महत्वाचा भाग होता आणि आमच्यासोबत त्याचा दर्जा अधिक सुधारला. परंतु, आम्ही त्याला ९ कोटींमध्ये संघात कायम ठेवले असते, तर तो संघ बनवू शकलो नसतो, जो आत्ता बनवला आहे.”
दरम्यान, १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव संपला. राजस्थान रॉयल्सने ८९ कोटी रुपाये खर्च करून एकूण २४ खेळाडूंना खरेदी केले.
महत्वाच्या बातम्या
रैनासह ‘या’ ४ भारतीयांना मेगा लिलावात नाही मिळाला खरेदीदार, आता आयपीएल करियरवर लागणार कायमचा ब्रेक!
Photo: वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेत दोन हात करण्यास टीम इंडिया सज्ज! पंत सांभाळणार ‘उपकर्णधारपद’
चुरसीच्या लढतीनंतर गुजरात जायंट्स आणि पुणेरी पलटण संघातील सामना ३१-३१ ने बरोबरीत