IPLक्रिकेटटॉप बातम्या

IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा

एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी मोठा झटका लागला आहे. सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर आधीच संघातून बाहेर असल्यामुळे संघ चिंतेत आहे. तर आता संघाची डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर येत आहे. सीएसकेच्या एका दिग्गज अष्टपैलूला संघासोबत सहभागी होण्यासाठी आधी ठरलेल्या वेळेपक्षा उशीर होण्याची शक्यता आहे.

सीएसके आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात २६ मार्च रोजी आयपीएल २०२२ चा पहिला सामना खेळला जाणार आहे. परंतु, या सामन्यासाठी सीएसकेचे काही दिग्गज खेळाडू उपस्थित नसणार आहेत. अशातच अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) विषयी मोठी बातमी मिळत आहे. इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मोईन अलीला अद्याप भारताचा व्हिसा मिळाला नसल्यामुळे त्याला सीएसकेच्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी उशीर होईल, अशी शक्यता आहे.

असे असले तरी, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन (Kashi Vishwnathan) यांना अपेक्षा आहे की मोईन अलीला वेळत व्हिसा मिळेल आणि भारतात येण्यासाठी जास्त अडथळा येणार नाही. विश्वनाथन यांच्या मते मोईन अली नेहमी भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे त्याला लवकरच व्हिसा मिळेल.

कागदपत्रे मिळताच मोईन अली भारतासाठी होणार रवाना 

विश्वनाथन म्हणाले की, मोईनने २८ फेब्रुवारीला व्हिसासाठी अर्ज केला होता आणि २० दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. तो नियमित पणे भारतात येत असतो, पण अद्याप ट्रॅव्हल पेपर्स त्याच्या हातत आलेले नाहीत. विश्वनाथन यांच्या म्हणण्यानुसार मोईन अलीने त्यांना सांगितले आहे की, ट्रॅव्हल पेपर्स मिळताच, तो पुढच्या फ्लाइटने भारतासाठी रवाना होईल. सीईओ म्हणाले, ते आशा करत आहेत की, सोमवारपर्यंत पेपर्स मिळतील.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar)  दुखापतग्रस्त झाला होता आणि त्यातून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाहीय. त्यामुळे दीपक चाहर या हंगामात सीएसकेसाठी खेळेल की नाही, याची कसलीही खात्री देता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या –

पंजाब किंग्ज ठरणार नवीन आयपीएल चॅम्पियन? संघाचा नवा कर्णधार मयंक अगरवाल म्हणतोय…

अन् ‘त्या’ चिमणीला लॉर्ड्स संग्रहालयात मिळाली जागा, वाचा काय आहे कहाणी

आरसीबीचे कर्णधारपद हाती घेताच डू प्लेसिसने विरोधी संघासाठी वाजवली धोक्याची घंटी? व्हिडिओ पाहाच

Related Articles