भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी रविवारी (दि. ०१ मे) पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला. आयपीएल २०२२ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते. रवींद्र जडेजा सीएसकेचा नवीन कर्णधार बनला, पण त्याला ही जबाबदारी पेलता आली नाही. जडेजाने काही दिवसांपूर्वी सीएसकेच्या कर्णधारपदावरून माघार घेतली आणि धोनी पुन्हा कर्णधार बनला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कर्णधाराच्या रूपात धोनीने जेव्हा मैदानात पाय टाकला, तेव्हा त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) कर्णधार बनल्यानंतर पुढच्या आठ सामन्यात सीएसकेचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. या आठ सामन्यांपैकी ६ सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला. परंतु एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा कर्णधार बनल्यानंतर सीएसकेला देखील सूर गवसला. चालू हंगामात धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. या सामन्यात सीएसकेने सनरायझर्स हैदराबादला १३ धावांनी मात दिली. यादरम्यान, धोनी आता टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाचे नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू बनला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यापूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधाराची भूमिका बजावणरा सर्वात वयस्कर खेळाडू राहुल द्रविड होता. सध्याचा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ४० वर्ष आणि २६८ दिवस वय असताना राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. धोनीने आता ४० वर्ष २९८ दिवसांच्या वयात सीएसकेचे कर्णधारपद पुन्हा स्वीकारून राहुलचा हा विक्रम मोडीत काढला आहे. धोनी आता या यादीत पहिल्या, तर राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. सुनील जोशी (४० वर्ष १३५ दिवस), अनिल कुंबळे (३९ वर्ष ३४२ दिवस), सौरव गांगुली (३९ वर्ष आणि ३१६ दिवस) यांनी नाणे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर येतात.
चालू हंगामात पहिल्या सामन्यापासून निराशाजनक प्रदर्शन करणाऱ्या सीएसकेले रविवारी धोनीने कर्णधारपद स्वीकारताच आक्रमक रूप दाखवले. प्रथम फलंदाजी करताना अवघ्या २ विकेट्सच्या नुकसानावर सीएसकेने २०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद मर्यादित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावांपर्यंत पोहोचू शकला. परिणामी सीएसकेने १३ धावांनी विजय मिळवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा मोहसिन खान आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर
हार्दिक १०० वा आयपीएल सामना जिंकून भलताच खुश; आरसीबीविरुद्धचा विजय ‘या’ लोकांना समर्पित
मार्शची प्रामाणिकता दिल्लीला पडली महागात अन् गमावला सामना? वाचा नक्की काय झालं