भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी (६ मार्च) आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे (IPL 2022 Schedule) संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगचा आगामी हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ २७ एप्रिलपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यांचा पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (MIvDC) विरुद्ध होईल.
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) आगामी हंगाम मुंबई आणि पुण्यातील ४ स्टेडियममध्ये आयोजित केला जाणार आहे. यादरम्यान, ७० लीग सामन्यांव्यतिरिक्त, चार प्ले-ऑफ सामने होतील. आयपीएलचा हा हंगाम एकूण ६५ दिवस चालणार आहे. अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी पाचवेळा स्पर्धा जिंकली आहे. मुंबई इंडियन्सच्या संपूर्ण वेळापत्रकाबद्दल जाणून घेऊया.
मुंबई इंडियन्स आपल्या हंगामाची सुरुवात २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियम येथे करेल. त्यानंतर त्यांचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध २ एप्रिल रोजी डी वाय पाटील स्टेडियम येथे होईल. हे दोन्ही सामने दुपारी चार वाजता खेळविण्यात येतील. त्यानंतर पुढील तिन्ही सामने त्यांना पुणे येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळायचे आहेत. संध्याकाळी सात वाजता सुरु होणारे हे तिन्ही सामने अनुक्रमे ६, ९ व १३ एप्रिल रोजी केकेआर, आरसीबी व पंजाब किंग्स या संघांशी होतील. त्यानंतर १६ व १९ एप्रिल रोजी ते लखनऊ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याशी भिडतील. २४ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर त्यांची पुन्हा लखनऊ संघाशी गाठ पडेल.
MI vs ___? 🧐
Paltan, which match excites you the most? 🤩💙#OneFamily #MumbaiIndians #TATAIPL pic.twitter.com/kHxg0nCaDI
— Mumbai Indians (@mipaltan) March 6, 2022
राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांशी ते अनुक्रमे ३० एप्रिल, ६ मे व ९ मे रोजी आमने-सामने येतील. मुंबईचे अखेरचे तीन सामने वानखेडे स्टेडियमवर १२ मे, १७ मे आणि २१ मे रोजी सीएसके, सनरायझर्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्याशी होतील.
महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नच्या आठवणीत ढसाढसा रडला रिकी पाँटिंग; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील (mahasports.in)