मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १६ वा सामना शुक्रवारी (८ एप्रिल) खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो पंजाब किंग्सचा संभावित संघ
आयपीएलच्या १५ व्या हंगामात पंजाब किंग्स संघाने आत्तापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यातील दोन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला पराभूत गेले आहे. आता त्यांना चौथा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे.
या सामन्यासाठी पंजाब किंग्सच्या संभावित ११ जणांच्या (PBKS Predicted XI) संघाचा विचार करायचा झाल्यास मयंक अगरवाल (Mayank Agarwal) आणि शिखर धवन सलामीला फलंदाजी करू शकतात. तसेच जॉनी बेअरस्टोचे संघात आगमन होऊ शकते. त्याला भानुका राजपक्षेच्या जागेवर संधी मिळू शकते. त्याचबरोबर मधल्या फळीत अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा खेळताना दिसू शकतात, तर गोलंदाजीत अष्टपैलू ओडियन स्मिथबरोबर कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव आरोरा आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते.
पंजाब किंग्सचा संभावित संघ: मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो/भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव आरोरा आणि अर्शदीप सिंग
असा असू शकतो गुजरात टायटन्सचा संभावित संघ
आयपीएलमधील नवा संघ असला तरी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या दोनपैकी दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे पंजाबविरुद्धही ही विजयी लय कायम राखण्याचा गुजरातचा मानस असेल.
दरम्यान, पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी गुजरातच्या संभावित ११ जणांच्या संघाचा (GT Predicted XI) विचार करायचा झाल्यास, यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजी करू शकतात. तर मधल्या फळीत डेव्हिड मिलरसह अष्टपैलू विजय शंकर, हार्दिक पंड्या (Hardik Pandya), राहुल तेवतिया, अभिनव मनोहर हे खेळू शकतात. त्याचबरोबर गोलंदाजीत राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, वरुण ऍरॉन आणि मोहम्मद शमी हे महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.
गुजरात टायटन्सचा संभावित संघ: मॅथ्यू वेड, शुबमन गिल, डेव्हिड मिलर, विजय शंकर, हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, वरुण ऍरॉन आणि मोहम्मद शमी.
अशी असू शकते ड्रीम ११
पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात लायन्स संघात (Punjab Kings vs Gujarat Titans) होणाऱ्या सामन्यातील ड्रीम ११ बद्दल (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून जॉनी बेअरस्टो किंवा भानुका राजपक्षे यांच्यातील ज्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळेल त्याला निवडू शकतो. तसेच फलंदाजीत शिखर धवन, शुबमन गिल, मयंक अगरवाल, शाहरुख खान हे चांगली कामगिरी करू शकतात, तर अष्टपैलू म्हणून लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवातिया यांना संधी मिळू शकते. तर गोलंदाजीत राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि राहुल चाहर यांना संधी दिली जाऊ शकते. कर्णधार म्हणून शिखर धवन आणि उपकर्णधार म्हणून राशिद खानचा चांगला पर्याय असू शकेल.
कर्णधार – शिखर धवन
उपकर्णधार – राशिद खान
यष्टीरक्षक – जॉनी बेअरस्टो/भानुका राजपक्षे
फलंदाज – शिखर धवन, शुबमन गिल, मयंक अगरवाल, शाहरुख खान
अष्टपैलू – लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवातिया
गोलंदाज – राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, राहुल चाहर.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर फलंदाजांवर भडकला रिषभ पंत; म्हणाला, ‘फलंदाजीत आम्ही…’
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल पंजाब वि. गुजरात सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
कहर योगायोग! जन्मदिनाच्या तारखेएवढ्याच धावा कारकिर्दीत करणारा एकमेव खेळाडू