मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात मंगळवारपर्यंत सर्व संघांचा प्रत्येकी एक सामना खेळून झाला आहे. आता बुधवारी (३० मार्च) या हंगामातील सहावा सामना रंगणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना असणार आहे. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ब गटात आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स अ गटात आहे. त्यामुळे या हंगामातील साखळी फेरीत या दोन संघात हा एकमेव सामना होणार आहे.
असे असू शकतात संभावित संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात फारसा बदल करण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या सामन्यात खेळवलेले बहुतेक खेळाडू कोलकाताविरुद्धही खेळताना दिसतील. पंजाब किंग्सविरुद्ध पहिल्या सामन्यात बेंगलोरच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. पण, गोलंदाजांकडून निराशा झाली होती.
आता कोलकाताविरुद्धही कर्णधार फाफ डू प्लेसिस, अनुज रावत सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतात, तर दिनेश कार्तिक यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. त्याच्यासह विराट कोहली आणि शेर्फेन रुदरफोर्ड मधली फळी सांभाळतील. अष्टपैलू म्हणून शाहबाज अहमद आणि वनिंदू हसरंगा यांना संधी मिळू शकते. डेविड विली, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि कर्ण शर्मा यांच्यावर गोलंदाजांची भिस्त असू शकते.
कोलकाता नाईट रायडर्स संघाबद्दल बोलायचे झाल्यास ते विजयाची लय कायम राखण्याचा या सामन्यात प्रयत्न करतील. तसेच त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघातही फारसा बदल होण्याची शक्यता नाही. त्यांच्याकडून पहिल्या सामन्याप्रमाणेच अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर सलामीला फलंदाजी करू शकतात. तर मधली फळी नितीश राणा, सॅम बिलिंग्ससह कर्णधार श्रेयस अय्यर सांभाळू शकतो. त्यांना यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनचीही साथ मिळेल. अष्टपैलू म्हणून आंद्रे रसेल आणि सुनील नारायण संघात असतील तर गोलंदाजीची जबाबदारी शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्तीच्या खांद्यावर असू शकते.
आमने-सामने कामगिरी
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स २९ वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये १६ वेळा कोलकाताने विजय मिळवला आहे, तर १३ सामन्यात बेंगलोरने विजय मिळवला आहे.
हवामान आणि खेळपट्टी
हा सामना मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. हे मोठे मैदान असले, तरी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. तसेच सामना संध्याकाळी होणार असल्याने दवाचा परिणामही जाणवू शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी घेण्याचाच निर्णय घेऊ शकतो. तसेच या सामन्यादरम्यान २७ ते ३२ डिग्री दरम्यान तापमान असेल. त्याचबरोबर पावसाची शक्यता केवळ ४ टक्के असून संध्याकाळी हवेत ६५% च्या आसपास आर्द्रता असेल.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) बेंगलोर विरुद्ध कोलकाता (RCB vs KKR) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना ३० मार्च २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना डॉ. डी वाय पाटील स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नारायण, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीत, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, प्रथम सिंग, अभिजीत तोमर, रसिक सलाम, अमन हकीम खान, अशोक शर्मा, रमेश कुमार
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, चामा व्ही मिलिंद, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, लुवनीथ सिसोदिया, अनिश्वर गौतम.
महत्त्वाच्या बातम्या –
आता १९ वर्षांखालील महिला विश्वचषकही खेळला जाणार! स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही मोठी घोषणा
IPL 2022 | स्टेडियममधील प्रेक्षकांची टक्केवारी वाढणार? बीसीसीआयचा लवकरच निर्णय
Video: सामना हैदराबादचा, पण चर्चा मालकिणीची! काव्या मारनच्या आदांनी वेधले सर्वांचेच लक्ष