आयपीएल २०२१ चे जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी (३० नोव्हेंबर) आपले चार खेळाडू रिटेन केले. यामध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे फ्रेंचायझीने जडेजावर जास्त पैसे खर्च केले आहेत. याआधी धोनी हा संघाचा सर्वात महागडा खेळाडू होता, पण आता त्याच्या जागी रवींद्र जडेजाचा समावेश करण्यात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) महेंद्रसिंग धोनीला १२ कोटी तर जडेजाने १६ कोटी खर्चून रिटेन केले आहे. यासह रवींद्र जडेजा आता लीगमधील धोनीपेक्षा महागडा खेळाडू बनला आहे. त्याच्याशिवाय युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडलाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू मोईन अलीलाही परदेशी खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
सीएसकेच्या व्यवस्थापक मंडळाने आधीच घोषित केले होते की, धोनी संघासोबत पुढील तीन वर्षे जोडलेला राहील. असे असतांना देखील धोनीला रिटेंशन यादीत वरचे स्थान नको होते. याकरता त्याने स्वतः सीएसकेच्या व्यवस्थापक मंडळाला आग्रह धरला होता. त्याच्याऐवजी इतर दुसऱ्या खेळाडूला रिटेंशन यादीत पहिले स्थान देऊन संघात कायम करावे, असे त्याने सीएसके फ्रँचायझीला कळवले होते. धोनीच्या या निर्णयाचे सर्वत्र भरपूर कौतुक होते आहे.
धोनीपेक्षा अधिक रक्कम काही खेळाडूंना मिळाली आहे
संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून १४ कोटी मिळणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सडने आंद्रे रसेलला १२ कोटी दिले आहेत. म्हणजेच धोनी इतकीच रक्कम त्याने घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार रिषभ पंतला १६ कोटींमध्ये, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला १४ कोटींमध्ये, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला १६ कोटींमध्ये, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विराट कोहलीला १५ कोटींमध्ये कायम केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सने रिटेन केलेले खेळाडू
रवींद्र जडेजा – १६ कोटी
महेंद्रसिंग धोनी – १२ कोटी
मोईन अली – ८ कोटी
ऋतुराज गायकवाड – ६ कोटी
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ जखमी क्रिकेटरने मुंबई कसोटीआधी केली सरावाला सुरुवात, किवींना फोडणार घाम
कसोटी सामना सुरु असतानाच ‘या’ महत्त्वाच्या सदस्याने सोडली पाकिस्तान संघाची साथ
श्रेयसने सांगितला अश्विनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यावेळी वानखेडेत बॉल बॉय होता शतकवीर