मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर शुक्रवारी (२२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रोमांचक लढत झाली. या सामन्यात राजस्थानने १५ धावांनी विजय मिळवला. राजस्थानसाठी जोस बटलर चालू हंगामात उत्कृष्ट खेळ दाखवत आला आहे आणि या सामन्यात त्याने पुन्हा एक शतक ठोकले. बटलरने ९ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने चालू हंगामातील हे तिसरे शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १०० मीटरपेक्षा मोठे दोन षटकार देखील निघाले.
दिल्लीविरुद्ध बटलरने सुरुवातीला संयमी खेळ दाखवला आणि नंतर विस्फोटक रूप धारण केले. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये जोस बटलर (Jos Buttler) याने आतापर्यंत ४ वेळा १०० मीटर पेक्षा मोठे षटकार मारले आहेत. दिल्लीविरुद्ध फलंदाजी करताना १० व्या षटकातील ५ वा चेंडू त्याने मिड ऑनच्या वरून षटकारासाठी खेळला. शार्दुल ठाकुरने टाकलेल्या या चेंडूवर त्याने १०७ मीटर लांबीचा षटकार मारला. चालू हंगामातील हा तिसरा सर्वात मोठा षटकार ठरला. यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या डेवाल्ड ब्रेविसने ११२ आणि पंजाब किंग्जच्या लियाम लिविंगस्टोनने १०७ मीटर लांबीचे षटकार मारले आहेत.
Absolutely Incredible Batting 🔥
107M, 105M Sixes >> Back to Back Hundreds 💯💯💯🏏🏏🏏 ArangeCap 🧡 #JosButtler 💖👌 pic.twitter.com/3qdOFOU26O— 🦋 Sathya🎱🧚♀💛 (@Sathyaaaa8) April 22, 2022
त्यानंतर डावाच्या १५ व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजीसाठी आला होता. बटलरने कुलदीपच्या या षटकातील पहिलाच चेंडू १०० मीटर पेक्षा लांब मारला. कुलदीपने हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता. बटलरने यावर एक पाय बाहेर काडून डीप मिड विकेटच्या वरून षटकार ठोकला. हा षटकार १०५ मीटर लांब होता.
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २ विकेट्सच्या नुकसानावर २२२ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला मर्यादित २० षटकांमध्ये हे लक्ष्य गाठता आले नाही. दिल्लीने ८ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या आणि १५ धावांनी पराभव स्वीकारला.
राजस्थानसाठी बटलरने ६५ चेंडूत ११६ धावांची सर्वोत्तम खेळी केली. सलामीवीर देवदत्त पडिक्कलने ३५ चेंडूत ५४ धावा करून त्याची चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची मोठी भागीदारी पार पाडली आणि संघाला चांगली सुरुवात दिली. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने अवघ्या १९ चेंडूत ४६ धावांचे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 | प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील का चेन्नई आणि मुंबई संघ? जाणून घ्या उभय संघांची समीकरणे
‘खूश आहे की कंपनीच्या नावात माही’, धोनीच्या खेळावर आनंद महिंद्राही फिदा
‘नक्कीच ते बरोबर नव्हते’, पंतने मान्य केली चूक, तर नो बॉल वादाबद्दल सॅमसन म्हणाला…