रविवारी (१ मे) खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२मधील डबल हेडरचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. सीएसकेचे सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी संघासाठी अप्रतिम खेळी केली आणि एक चांगली सुरुवात दिली. यादरम्यान दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी झाली आणि काही महत्वाचे विक्रम देखील घडले. सीएसकेने हा सामना १३ धावांनी जिंकला.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ चेंडूत १८२ धावांची भागीदारी पार पाडली. चेन्नई सुपर किंग्जसाठी एखाद्या जोडीने केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. ही भागीदारी अजून मोठी होऊ शकत होती, पण ऋतुराज गायकवाड ९९ धावांसह खेळत असताता झेलबाद झाला आणि भागीदारी देखील तुटली. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने या धावा केल्या. डेवॉन कॉनवे मात्र शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला. कॉनवेने ५५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा उभ्या केल्या. या दोघांच्या प्रदर्शनामुळे सीएसकेने २ विकेट्सच्या नुकसानावर २०२ धावा करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जसाठी केली गेलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस या दिग्गज जोडीच्या नावावर होता. या दोघांनी आयपीएल २०२०मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध १८१ धावांची भागीदारी केली होती आणि नाबाद राहिले होते. आता या जोडीचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे ही जोडी आहे. या दोघांनी आयपीएल २०२२ म्हणजेच चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १६५ धावांची भागीदारी केली होती.
सीएसकेसाठी आयपीएल इतिहासात केल्या गेलेल्या सर्वात मोठ्या भागीदाऱ्या
१८२ – ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (आयपीएल २०२२)*
१८१ – शेन वॉटसन आणि फाफ डू प्लेसिस विरुद्ध पंजाब किंग्ज (आयपीएल २०२०)
१६५ – रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आयपीएल २०२२)
ऋतुराज आणि कॉनवेची ही भागीदारी फक्त सीएसकेसाठीच खास नव्हती, तर हैदराबादसाठी देखील त्यांनी महत्वाचा विक्रम नोंदवला आहे. या दोघांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी देखील केली. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि एबी डिविलियर्स आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर जोस बटलर आणि संजू सॅमसन ही जोडी आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलमध्ये केल्या गेलेल्या सर्वात मोठ्या भागीदाऱ्या
१८२ – ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे (आयपीएल २०२२)*
१५७ – विराट कोहली आणि एबी डिविलियर्स (आयपीएल २०१६)
१५० – जोस बटलर आणि संजू सॅमसन (आयपीएल २०२१)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL | पुण्याच्या ऋतुराजने ‘मुंबईच्या सचिनची’ अवघ्या ३१ इनिंगमध्ये केली बरोबरी
शंभराहून मोलाचे नव्व्याण्णव! ऋतुराजचे आयपीएलमधील दुसऱ्या शतकाचे स्वप्न भंगले