आयपीएलच्या मैदानात शुक्रवार (२२ एप्रिल) रोजी राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव मिळाला. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १५ धावा कमी पडल्यामुळे त्यांनी सामना गमावला. सामन्याच्या शेवटच्या षटकात पंचांच्या एका निर्णयानंतर कर्णधार रिषभ पंत संतापल्याचेही दिसले होते. या सर्व प्रकारानंतर दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने संघातील वातावरणाविषयी माहिती दिली.
शेन वॉटसन (Shane Watson) म्हणल्याप्रमामे मैदानात शेवटच्या षटकात झालेला वाद आणि त्यानंतर मिळालेला पराभव पचवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला थोडा वेळ लागला. दिल्लीला त्यांचा पुढचा सामना केकेआरसोबत खेळायचा आहे आणि त्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या युट्यूब चॅनेलवर वॉटसनचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने शेअर केलेल्या व्हिडिओत शेन वॉटसन म्हणत आहे की, “मागच्या सामन्यात जे झाले ते पचवण्यासाठी, त्या परिस्थितीत काम करण्यासाठी सक्षम होण्यासाठी एक किंवा दोन दिवस लागले. या स्थितीतून बाहेर निघून हे सुनिश्चित करावे लागले की, सर्व गोष्टी योग्य दिशेने चालल्या आहेत.”
वॉटसनने पुढे बोलताना रोवमन पॉवेलचेही कौतुक केले, ज्याने राजस्थानविरुद्ध शेवटच्या षटकात कडवी झुंज दिली, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. “हे रोवमॅन आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी रोमांचक होते. त्यांच्याकडे अविश्वसनीय शक्ती आहे आणि अविश्वसनीय कौशल्यही आहे. त्याने अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर वेस्ट इंडिजसाठी हे दाखवले आहे.”
दरम्यान, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी शेवटच्या षटकात ३६ धावांची आवश्यकता होती. स्ट्राईकवर असलेल्या रोवमन पॉवेलने षटकातील पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार मारले. याच वेळी कर्णधार रिषभ पंतने नो बॉलसाठी विवाद घातला. परंतु पंचांना नो बॉल दिला नाही. या वादामुळे रोवमॅनला सापडलेली लय बघडली आणि पुढच्या तीन चेंडूवर त्याला आवश्यक धावाही करता आल्या नाहीत. परिणामी दिल्लीला १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सीएसके त्याचे कुटुंब आहे, बंदी उठल्यानंतर आनंदात होता माही’, इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
‘बदलून टाका तो नियम’, पंत आणि आमरेंनी घातलेल्या राड्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकाची मोठी मागणी
चहलने सुधारली चूक! कार्तिकला रनआऊट करण्यात फुटला घाम, आधी चेंडू निसटला; मग घडलं असं काही