पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात झाली असून आता पाचवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सोमवारी (२९ मार्च) होणार आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी कशी असू शकते ड्रीम ११ हे पाहू.
अशी असू शकते राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन
राजस्थान संघ यंदा मजबूत दिसून येत आहे. त्यामुळे अंतिम ११ जणांचा संघ निवडणे कर्णधार संजू सॅमसन आणि संघव्यवस्थापनासाठी सोपे असणार नाही. या संघाकडून जोस बटलरसह देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकतो. तसेच यशस्वी जयस्वाल तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. याशिवाय मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी कर्णधार सॅमसनसह शिमरॉन हेटमायरवर असू शकते.
राजस्थानच्या अंतिम ११ जणांच्या संघात अष्टपैलू म्हणून रियान परागसह जिमी निशाम किंवा नॅथन कुल्टर-नाईलला संधी मिळू शकते. तसेच राजस्थानकडे आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा अशा अनुभवी गोलंदाजांची फौज आहे.
राजस्थान रॉयल्सचा संभावित संघ –
जोस बटलर (यष्टीरक्षक), देवदत्त पडीक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जिमी निशाम/नॅथन कुल्टर-नाईल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा
अशी असू शकते सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबादमधून यंदा डेव्हिड वॉर्नर, राशिद खान सारखे दिग्गज खेळाडू बाहेर पडले आहेत. त्यामुळे संघांची जवळपासू पूर्णपणे नवीन बांधणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता अंतिम ११ जणांमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहाणे औत्सुक्याचे असणार आहे.
हैदराबादच्या संभावित ११ जणांच्या संघाबाबत बोलायचे झाल्यास दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करमबरोबर भारताचा युवा अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजी करू शकतो. तसेच मधली फळी कर्णधार केन विलियम्सनसह राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, अब्दुल सामद हे सांभाळू शकतात, तर वॉशिंग्टन सुंदर आणि रोमरियो शेफर्ड यांना अष्टपैलू कामगिरी करावी लागेल. याशिवाय गोलंदाजीत उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन हे गोलंदाजीची जबाबदारी घेऊ शकतात.
सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ –
एडेन मार्करम, अभिषेक शर्मा, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, अब्दुल सामद, वॉशिंग्टन सुंदर, रोमरियो शेफर्ड, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन
अशी असू शकते ड्रीम ११
यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन आणि जोस बटलरला ड्रीम ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते, तसेच फलंदाजीत केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, देवदत्त पडीक्कल चांगली कामगिरी करू शकतात, तर अष्टपैलू म्हणून अब्दुल सामद आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात चांगले योगदान देण्याची क्षमता आहे. गोलंदाजांचा विचार करायचा झाल्यास ट्रेंट बोल्ट, आर अश्विन, युजवेंद्र चहल हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले गोलंदाज ड्रीम ११ मध्ये स्थान मिळवू शकतात. तसेच उमरान मलिकही त्याच्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधू शकतो.
कर्णधार आणि उपकर्णधाराचा विचार करायचा झाल्यास युजवेंद्र चहलला कर्णधार केले जाऊ शकते. कारण एमसीए स्टेडियममध्ये फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्याचमुळे वॉशिंग्टन सुंदरला त्याच्यातील अष्टपैलू क्षमता पाहाता उपकर्णधार केले जाऊ शकते. (IPL 2022: Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Dream XI)
कर्णधार – युजवेंद्र चहल
उपकर्णधार – वॉशिंग्टन सुंदर
यष्टीरक्षक – संजू सॅमसन, जोस बटलर
फलंदाज – केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, देवदत्त पडीक्कल
अष्टपैलू – अब्दुल सामद, वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज – ट्रेंट बोल्ट, आर अश्विन, युजवेंद्र चहल, उमरान मलिक
महत्त्वाच्या बातम्या –
आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल हैदराबाद वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सला जेतेपद जिंकून देणारा ‘स्वप्निल असनोडकर’