आयपीएलचा १५ वा हंगाम सुरू होण्यासाठी आता फक्त १३ दिवसांचा कालावधी राहिला आहे. आयपीएल २०२२ मधील सामने यावर्षी महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथील ४ स्टेडिअममध्ये खेळवले जाणार आहेत. यामध्ये मुंबईतील तीन स्टेडिअम वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील या स्टेडिअममध्ये एकूण ५५ सामने खेळवले जातील. तसेच, पुण्याच्या एमसीए स्टेडिअममध्ये १५ सामने खेळवले जातील. या हंगामात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत.
यामध्ये गुजरात लायन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स (CSK), कोलकाता नाईट रायडर्स (KKR), मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (PBKS), दिल्ली कॅपिटल्स (DC), सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे जुने संघ आहेत.
या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच काही संघ मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच, त्यांच्या सरावालाही सुरुवात झाली आहे. आता कोणता संघ मुंबईच्या कोणत्या हॉटेलवर थांबला आहेत, हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
१. मुंबई इंडियन्स–
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला मुंबई इंडियन्स संघ वांद्रेच्या ट्रायडेंट बीकेसी हॉटेलमध्ये थांबला आहे. हे हॉटेल मुंबईचे बिझनेस हब मानले जाणाऱ्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. या हॉटेलमध्येही स्पा आणि फिटनेस सेंटर आहे, जे खेळाडूंना सामन्याचा थकवा दूर करण्यास मदत करेल.
२. चेन्नई सुपर किंग्स–
तब्बल ४ वेळा आयपीएलचे किताब जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आपला ठिय्या नरिमन पॉईंटसारख्या पॉश भागातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मांडला आहे. ३५ मजली हॉटेलवरून समुद्राचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. इथून वानखेडे स्टेडिअम अवघे ३ किलोमीटर दूर आहे. ट्रायडेंट हॉटेलची गणना सर्वात जुन्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये होते.
३. कोलकाता नाईट रायडर्स–
आयपीएलचा २ वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ मुंबईच्या परळ येथील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये थांबला आहे. या हॉटेलचे विशेष म्हणजे, या हॉटेलच्या ३६० अंशाच्या कोनातून शहर दिसते. या हॉटेलमध्ये स्पा, फिटनेस सेंटर, इनडोअर पूल अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
४. पंजाब किंग्स–
पंजाब किंग्स संघ मुंबईच्या पवई येथील रेनेसान्स हॉटेलमध्ये थांबला आहे. हे हॉटेल छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अवघे ४.३ किलोमीटर दूर आहे. इथे आऊटडोर पूल, स्पा आणि फिटनेस सेंटरही आहे.
५. सनरायझर्स हैदराबाद–
सनरायझर्स हैदराबाद संघाने आयटीसी मराठा हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. हे अंधेरी पूर्वमधील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त १.१ किलोमीटरच्या अंतरावर आहे. मसाज चेअर आणि बटलर सेवा या हॉटेलच्या सर्वोत्तम सेवेमध्ये गणल्या जातात.
६. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर–
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ वांद्रेच्या ताज लँड एंड हॉटेलमध्ये थांबला आहे. या हॉटेलला ‘मुंबईची राणी’ म्हणूनही ओळखले जाते. हे हॉटेल समुद्रापासून फक्त २०० मीटर अंतरावर आहे. या हॉटेलमधून अरबी समुद्र आणि वांद्रे वरळी सी लिंकचे विहंगम दृश्य दिसते.
७. राजस्थान रॉयल्स–
राजस्थान रॉयल्स संघ सांताक्रूझ पूर्व भागात असलेल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये थांबला आहे. हे हॉटेल बाली, दुबई आणि हाँगकाँगमध्येही आहे. हे हॉटेल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जवळ आहे.
८. दिल्ली कॅपिटल्स–
दिल्ली कॅपिटल्स संघ सर्वात प्रसिद्ध ताज पॅलेस हॉटेलमध्ये थांबला आहे. हे हॉटेल कुलाबा येथे आहे. हे ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या अगदी जवळ आहे. इथून अरबी समुद्राचा शानदार नजाराही पाहायला मिळतो. इथून वानखेडे स्टेडिअम २०-२५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
९. लखनऊ सुपर जायंट्स–
आयपीएल २०२२मधील नवीन संग लखनऊ सुपर जायंट्स दक्षिण मुंबईच्या ताज विवांता हॉटेलमध्ये थांबला आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हॉटेलपासून फक्त २ किलोमीटर अंतरावर आहे. इतर हॉटेलप्रमाणे इथेही वायफाय, स्विमींग पूल, फिटनेस सेंटर आणि स्पा यांसारख्या सुविधा आहेत.
१०. गुजरात लायन्स–
आयपीएल २०२२ मध्ये नव्याने सामील झालेल्या दुसऱ्या संघामध्ये गुजरात टायटन्सचा समावेश होतो. गुजरात संघ जेडब्ल्यू मॅरियटमध्ये थांबला आहे. हे हॉटेल मुंबईच्या अंधेरी भागात आहे. या हॉटेलच्या जवळ जुहू बीच, इस्कॉन मंदिर, गोरेगाव फिल्म सिटी आणि संजय गांधी राष्ट्रीय पार्क आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी दर्शकांकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे जोरदार स्वागत, पण तो आला तसाच गेला; पाहा काय झालं?
‘नॅशनल क्रश’ स्म्रीती मंधना करतेय ‘या’ गायकाला डेट? त्यानेही हातावर गोंदलय ‘एसएम१८’
दुसऱ्या कसोटीत विराटने केले असे काही की, चाहत्यांनी दिले त्याच्या अन् डिविलियर्सच्या नावाचे नारे