इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. टॉप फोरमधील पहिल्या दोन संघात अर्थात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने सामन्याला उशीर होत आहे.
आयपीएल इतिहासात प्रथमच आयपीएल अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. सायंकाळी सात वाजता नाणेफेक होऊन 7:30 वाजता सामना सुरू होणे गरजेचे होते. मात्र, सायंकाळी सहा वाजल्यापासून अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सर्व खेळाडू व कर्मचारी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. नऊ वाजण्याच्या सुमारास काही मिनिटांसाठी पाऊस थांबला. मैदान कर्मचाऱ्यांनी मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला असतानाच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
हा सामना 9:30 वाजेपर्यंत सुरू झाला असता तर संपूर्ण वीस षटकांचा खेळ पाहण्यास मिळाला असता. मात्र, मैदान खेळण्यासाठी तयार न झाल्याने सामन्यातील षटके कमी करण्यात आली. हा सामना दहा वाजेपर्यंत सुरू झाल्यास प्रत्येकी 17 षटकांचा खेळ होईल. तर 10:30 पर्यंत खेळ सुरू झाल्यास प्रत्येकी 15 षटकांचा खेळ होणार आहे. तसेच 11 वाजण्याच्या पुढे खेळ सुरू झाल्यास 12 षटकांचा खेळ होणार आहे. या व्यतिरिक्त 12 वाजण्याच्या पुढे खेळ सुरू न झाल्यास सोमवारी हा अंतिम सामना खेळण्यात येईल. सोमवारी देखील खेळ न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येईल.
(IPL 2023 Final Scenario If Over Deducted)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रायुडूने निवृत्ती जाहीर केली, पण त्याच्या ‘या’ 5 खेळी कायम राहतील आठवणीत; वाचाच
सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’