शुक्रवारी (28 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. आपले होम ग्राउंड असलेल्या मोहाली स्टेडियमवर शिखर धवन याच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जला 56 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 5 बाद 257 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघ 19.4 षटकात 201 धावा करून सर्वबाद झाला.
लखनऊ सुपर जायंट्सने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या लखनऊने या सामन्यात साकारली. पंजाब किंग्जला विजयासाठी लखनऊने 258 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे पंजाबला गाठता आले नाही. पंजाबसाठी अथर्व तायडे याने 36 चेंडूत सर्वाधिक 66 धावा कुटल्या. सिकंदर रझा याने 22 चेंडूत 36 धावा करून विकेट गमावली. संघातील दुसरा एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
लखनऊसाठी फलंदाजांप्रमाणचे त्यांच्या गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली. यश ठाकूर याने 37 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर नवीन उल हक याने 30 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई याने 4 षटकांमध्ये 41 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. तर मार्कस स्टॉयनिसने एक विकेट घेतली. तत्पूर्वी स्टॉयनिसने फलंदाजी करताना लखनऊसाठी सर्वाधिक 72 धावा कुटल्या होत्या. या धावा करण्यासाठी त्याने अवघे 40 चेंडू खेळले.
लखनऊच्या फलंदाजी क्रमात सलामीवीर कायल मेयर्स याने 24 चेंडूत 54 धावा करून संघाला वेगवान सुरुवात दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आयुष याने 43, चौथ्या क्रमांकावर स्टॉयनिसने 72 आणि त्यानंतर निकोलस पूरन याने पाचव्या क्रमांकावर खेळाताना 19 चेंडूत 45 धावा केल्या. पंजाबसाठी कागिसो रबाडा याने 2 विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग याने, सॅम करून आणि लियाम लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. गुणतालिकेचा विचार केला, तर लखनऊ सुपर जायंट्स या विजयानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनऊने हंगामातील सुरुवातीच्या 8 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत. (Lucknow Super Giants won by 56 runs against Punjab Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
होऊ दे खर्च! बड्डेच्या दोन दिवस आधीच रोहितचे गिफ्ट चाहत्यांसमोर, हैदराबादच्या फॅनचा खास प्लॅन
“…तर विराटकडे WTC Final मध्ये नेतृत्व द्यावे”, रवी शास्त्रींनी सुचवली कल्पना