क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांना चकवा देण्यासाठी फलंदाज अनेकदा रिवर्स स्वीप किंवा स्विच हिट शॉट खेळतात. पण एखादा डावखुरा फलंदाज थेड उजव्या हाताने फलंदाजी करायला लागला, असे तुम्हीही कधी पाहिले नसेल. पण दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर याने असा प्रकार करून दाखवला. मंगळवारी (11 एप्रिल) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध वॉर्नरने उजव्या हाताने फलंदाजी केली. मुंबईने हा सामना 6 विकेट्सच्या अंतराने नावावर केला.
उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 19.4 षटकात 172 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 4 विकेट्सच्या नुकसानावर आणि डावातील शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले. मुंबईसाठी आयपीएल 2023 मधील हा पहिला विजय होता, तर दिल्लीसाठी हंगामातील सलग चौथा पराभव. दिल्ली कॅपिटल्सला देखील अद्याप चालू आयपीएल हंगामात एकही विजय मिळवता आला नाही. दरम्यान, डेविड वॉर्नर (David Warner) मात्र मंगळवारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. कारण ठरले त्याने उजव्या हाताने केकेली फलंदाजी.
David Warner turns right handed. pic.twitter.com/dXfFvoJx2C
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2023
दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील आठव्या षटकात डाव्या हाताने खेळणारा वॉर्नरने अचानक उजव्या हाताने खेळू लागला. वॉर्नरला उजव्या हाताने फलंदाजी करताना पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले. या षटकात मुंबईचा नवखा फिरकी गोलंदाज ऋतिक शौकीन गोलंदाजी करत होता. यादरम्यान डेविड वॉर्नर स्ट्राईकवर अशताना ऋतिकने एक नो बॉल टाकला. यानंतर पुढच्या चेंडूवर वॉर्नरला फ्री हीट मिळाली. याच वेळी वॉर्रने उजव्या हाताने फलंदाजीचा निर्णय घेतला. फ्री हिट असल्यामुळे वॉर्नरने हा निर्णय घेतला पण दुसरीकडे त्याला या संधीचा फायदा मिळाला नाही. या चेंडूवर त्याने फक्त एक धाव घेऊ शकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Omjanjire/status/1646044330568851456?s=20
दरम्यान सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर रोहित शर्मा मुंबईच्या विजया सर्वात मोठी भूमिका निभावू शकला. 45 चेंडूत 65 धावा केल्या. तत्पूर्वी दिल्लीसाठी कर्णधार वॉर्रनने 51, तर अक्षर पटेल याने 54 धावा केल्या. गोलंदाजी विभागात जेसन बेहरनडॉर्फ आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या आणि दिल्लीला मर्यादित धावसंख्येवर रोखले. 19व्या षटकता दिल्लीच्या तब्बल चार खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. (Ravichandran Ashwin bats right-handed)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रहीम अलीच्या दोन गोलने चेन्नईयन एफसीची सुपर कपमध्ये नॉर्थइस्टवर मात
वर्ल्डकपसाठी होऊ दे खर्च! चाहत्यांनी केलेल्या मागणीमुळे बीसीसीआय मोजणार 500 कोटी