---Advertisement---

याला म्हणतात चित्त्याची चपळाई! बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये पंजाबच्या शतकवीराचा ‘असा’ काढला काटा, Video

Trent-Boult
---Advertisement---

पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात आमने-सामने होते. शुक्रवारी (दि. 19 मे) धरमशाला येथे पार पडलेल्या या सामन्यात पंजाबला 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. संपूर्ण हंगामात पंजाबसाठी खोऱ्याने धावा काढणारा फलंदाज प्रभसिमरन सिंग या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खास कामगिरी करू शकला नाही. तो फक्त 2 धावा करून बाद झाला. त्याला ट्रेंट बोल्ट याने झेलबाद करून तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने पंजाबच्या डावात पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) याला झेलबाद केले. खरं तर, या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यादरम्यान पंजाबसाठी प्रभसिमरन आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, प्रभसिमरन 2 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. यादरम्यान राजस्थानकडून पहिले षटक टाकण्यासाठी ट्रेंट बोल्ट आला होता.

बोल्ट याने षटकातील दुसऱ्याच चेंडूवर प्रभसिमरन सिंग याची शिकार केली. प्रभसिमरन सिंग याने हा चेंडू मारला, पण चेंडू थेट बोल्टच्या दिशेने गेला. यावेळी त्याने हवेत झेप घेत हा कठीण झेल पकडला. बोल्टच्या या शानदार झेलाचा व्हिडिओ आयपीएलने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 2.5 लाख लोकांनीही हा व्हिडिओ पाहिला आहे. नेटकरी कमेंट्स करत या बोल्टच्या झेलाची प्रशंसा करत आहेत.

या सामन्यात प्रभसिमरन बाद झाल्यानंतर अथर्व तायडेही 19 धावांवर बाद झाला. त्यानंतर धवननेही 17 धावांवर विकेट गमावली. यावेळी पंजाबने सॅम करन (नाबाद 49), जितेश शर्मा (44) आणि शाहरुख खान (नाबाद 41) यांच्या जोरावर 5 विकेट्स गमावत 187 धावा केल्या होत्या. मात्र, हे आव्हान राजस्थानने 19.4 षटकात 6 विकेट्स गमावत पार केले. राजस्थानकडून यावेळी देवदत्त पडिक्कल (51), यशस्वी जयसवाल (50) यांनी अर्धशतक केले. तसेच, शिमरॉन हेटमायर (46), रियान पराग (20) आणि ध्रुव जुरेल (10) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.

प्रभसिमरन याच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत या हंगामात 13 सामने खेळताना 356 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकाचाही समावेश आहे. त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या ही 103 आहे. (ipl 2023 pbks vs rr cricketer prabhsimran singh catch out by trent boult in dharamshala see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPLमध्ये धवनचा भीमपराक्रम! 16 वर्षात कुणालाच न जमलेली कामगिरी दाखवली करून, विराट-रोहितलाही पछाडलं
चिमकुल्याने धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारताच ‘महानायक’ही फिदा; म्हणाले, ‘भारतीय क्रिकेटचं भविष्य…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---